Parliament Winter Session : अविश्वास प्रस्तावावरून राज्यसभेत प्रचंड गदारोळ; दुपारी १२ वाजेपर्यंत कामकाज तहकूब

Jagdeep Dhankhar faces no-confidence motion : राज्यसभेत सभापती जगदीप धनखड यांच्यावरील अविश्वास प्रस्तावावरून जोरदार गदारोळ झाला. यामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे.
VP Jagdeep Dhankhar
VP Jagdeep DhankharAgrowon
Published on
Updated on

New Delhi News : संसदेचे हिवाळी अधिवेश सुरू असून अदाणी आणि प्रकरणावरून संसदेचे अनेकदा कामकाज तहकूब झाले आहे. आज (ता.११) देखील राज्यसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करावे लागले आहे. राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला आहे. तर यावर ६० ते ७० विरोधी खासदारांच्या सह्या आहेत.

सभापती धनखड हे सत्ताधारी पक्षाची मर्जी राखत असून सभागृहात विरोधकांचा आवाज दाबत आहेत. विरोधकांना ते बोलू देत नाहीत, असा आरोप विरोधी खासदारांनी केला आहे. तर याबाबत धनखड यांच्याविरोधात प्रस्तावची नोटीस विरोधकांनी राज्यसभेचे महासचिव पी. सी. मोदी यांच्याकडे मंगळवारी दिली. तसेच याची प्रत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही देण्यात आली आहे.

VP Jagdeep Dhankhar
Vice President Jagdeep Dhankhar : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या विरोधात अविश्वास ठराव

आज याच मुद्द्यावरून दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. सभापती जगदीप धनखड यांना पदावरून हटवण्याबाबतची नोटीस आणि अदानी-सोरोसच्या मुद्द्यावरून राज्यसभेत सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले. सभागृहात जोरदार घोषणाबाजी झाली.

यावरून धनखड यांनी नाराजी व्यक्त करताना, सदन चालविण्यासाठी सर्वांना प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी वातावरण चांगले वातावरण निर्माण करावे लागेल. पण गदारोळ कमी होत नसल्याचे पाहून सभागृहाचे कामकाज धनखड यांनी १२ वाजेपर्यंत तहकूब केले.

VP Jagdeep Dhankhar
Parliament Winter Session 2024 : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांचा गदारोळ सुरूच; अदानी प्रकरणावरून संसद परिसरात निदर्शने

दरम्यान संसद भवन परिसरात तिरंगा आणि फुले घेऊन निषेध व्यक्त केला. या आंदोलनात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधीही उपस्थित आहेत. तर लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांना काँग्रेसकडून पत्र देण्यात आले आहे. ज्यात विरोधकांचा आवाज न दडपता सभागृहाचे कामकाज सुरळीत चालवण्याची मागणी करण्यात आली आहे. यामुद्द्यावरून आता सत्ताधारी खासदारांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

विरोधकांचा नेमका आरोप काय?

सभापती धनखड नेहमीच सत्ताधारी गटाची बाजू घेतात. ते विरोधकांचा आवाज दाबत आहेत, असा आरोप विरोधकांनी केला आहे. याआधी देखील सपा खासदार जया बच्चन यांच्याशी संबंधित वाद उफाळला होता. त्यावेळी देखील धनखड यांच्याविरोधात राज्यसभेत अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी झाली होती. मात्र तो सर्वानुमते टाळण्यात आला होता. आताही जी नोटीस देण्यात आली आहे. त्यात काँग्रेस खासदार सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सह्या नाहीत.

VP Jagdeep Dhankhar
VP Jagdeep Dhankhar : धनखड यांनी, काल सरकारला घरचा आहेर दिला आज विरोधकांना फटकारलं; म्हणाले मगरीचे अश्रू ढाळून नका

राज्यसभेत सध्याची स्थिती काय?

धनखड यांच्याविरोधात दिलेल्या नोटीसमध्ये ६० ते ७० खासदारांच्या सह्यांचा प्रस्तावाची सूचना राज्यसभेत सादर करण्यात आली आहे. यावरून केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी या प्रस्तावाचा निषेध करताना, हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी विरोधकांकडे आवश्यक संख्याबळ नाही, असे म्हटले आहे.

घटनेच्या कलम ६७ (बी) अन्वये विरोधी पक्षाच्या खासदारांनी मांडलेला प्रस्ताव पारित होण्यासाठी २४५ सदस्यांच्या सभागृहात बहुमतासाठी १२३ खासदारांची आवश्यकता असते. अशा स्थितीत भाजपचेच सभागृात ९५ खासदार आहेत. विरोधकांचे संख्याबळ १०० च्या आसपास आहे. तर राष्ट्रपती नियुक्त १२ खासादारांपैकी फक्त ६ खासदार अधिवेशात उपस्थित आहेत. तसेच या प्रस्तावात वायएसआरसीपी, बिजू जनता दल, एआयएडीएमके सामील नाहीत. याबाबत या पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. यामुळे फक्त नोटीस दिल्याने अविश्वास प्रस्ताव पारित होणे सध्यातरी शक्य नाही.

दोन्ही सभागृहातून ठराव पास होणे आवश्यक

विरोधी आघाडी भारतातील घटक पक्षांनी मंगळवारी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर यांना त्यांच्या पदावरून हटवण्याचा प्रस्ताव आणण्यासाठी नोटीस दिली आहे. दोन्ही सभागृहात बहुमताने प्रस्ताव मंजूर झाल्यानंतरच त्यांना उपाध्यक्षपदावरून हटवले जाऊ शकते, असे कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे. तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. यामुळे त्यांना हटवताना असा प्रस्ताव आणण्यासाठी किमान १४ दिवस आधी सूचना देणे आवश्यक असते. तर राज्यसभेत तत्कालीन सर्व सदस्यांच्या बहुमताने ठराव पास केला तर तो लोकसभेनेही मान्य व्हावा लागतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com