Lasalgaon Bajar Samiti Market Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Market Committee : ‘स्मार्ट’अंतर्गत लासलगाव बाजार समिती राज्यात प्रथम

Agriculture Market Updates : बाजार समित्यांची आर्थिक वर्षाच्या कामगिरीच्या आधारावर वार्षिक क्रमवारी पणन संचालनालयाकडून जाहीर करण्यात आली.

Mukund Pingale

Nashik News : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाअंतर्गत राज्यात पणन संचालनालयाकडून मागील वर्षापासून बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी जाहीर करण्यात येत आहे. त्यानुसार बाजार समित्यांची आर्थिक वर्षाच्या कामगिरीच्या आधारावर वार्षिक क्रमवारी पणन संचालनालयाकडून जाहीर करण्यात आली.

राज्यातील एकूण ३०५ बाजार समित्यांपैकी नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आणि पुणे जिल्ह्यातील बारामती बाजार समिती संयुक्तरीत्या पहिल्या क्रमांकावर आहेत. वाशीम जिल्ह्यातील कारंजा (लाड) बाजार समिती दुसऱ्या, तर अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर बाजार समिती तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या १० बाजार समित्यांमध्ये नाशिक विभागाने बाजी मारली आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पणन संचालनालयाअंतर्गत स्मार्ट प्रकल्प अंमलबजावणी कक्ष (कृषी पणन) यांच्यामार्फत बाजार समित्यांमधील पायाभूत व इतर सेवा सुविधा निकषांसाठी ८० गुण, आर्थिक निकषांसाठी ३५ गुण, वैधानिक कामकाज निकषांसाठी ५५ गुण व इतर निकषांसाठी ३० गुण असे एकूण २०० गुण निश्चित करण्यात आले होते.

त्यानुसार प्रकल्प अंमलबजावणी कक्षाने ठरवून दिलेल्या गुणांकनानुसार लासलगाव बाजार समितीच्या २०२२-२३ या वर्षाच्या वार्षिक कामगिरीची पहाणी जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) यांच्या मार्गदर्शनाखाली निफाडचे सहायक निबंधक यांच्या कार्यालयाने करून वस्तुनिष्ठ गुणांकनाचा प्रस्ताव पणन संचालनालयातील स्मार्ट प्रकल्प अंमलबजावणी कक्षास सादर केला होता.

या प्रस्तावाची छाननी करून वार्षिक क्रमवारीत लासलगाव व बारामती बाजार समितीस २०० गुणांपैकी १६९ गुण मिळाले. त्यानुसार लासलगाव समितीला दुसऱ्यांदा राज्यस्तरीय क्रमवारीत प्रथम क्रमांक दिला आहे. पणन सहसंचालक तथा स्मार्ट कक्षाचे नोडल अधिकारी दीपक शिंदे यांनी ही घोषणा केली.

लासलगाव बाजार समितीच्या गुणांकनात वाढ

२०२१-२२ वर्षांच्या क्रमवारीत प्रस्तावाची छाननी झाल्यानंतर  लासलगाव बाजार समितीस २०० गुणांपैकी १६३ गुण मिळाल्याने राज्यस्तरीय क्रमवारीत प्रथम क्रमांक मिळाला होता. तर २०२२-२३ वर्षात १६९ गुण मिळाले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत पायाभूत सुविधा निकषात २ तर इतर निकषांत ४ असे एकूण ६ गुण वाढले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT