Lasalgaon APMC Agrowon
ॲग्रो विशेष

Lasalgaon APMC : ‘स्मार्ट’ क्रमवारीत लासलगाव बाजार समिती विभागात प्रथम

APMC Ranking : स्मार्ट प्रकल्प राबविण्यात येत असून या प्रकल्पांतर्गत बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी प्रकाशित करणे हा एक प्रमुख घटक आहे.

Team Agrowon

Nashik News : जागतिक बँक अर्थसाह्यित मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत राज्यातील बाजार समित्यांच्या वार्षिक क्रमवारीत नाशिक विभागात लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समितीची सलग तिसऱ्यांदा प्रथम क्रमांकाने तर राज्यात चौथ्या क्रमांकावर निवड झाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती डी. के. जगताप यांनी दिली.

स्मार्ट प्रकल्प राबविण्यात येत असून या प्रकल्पांतर्गत बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी प्रकाशित करणे हा एक प्रमुख घटक आहे. त्याअंतर्गत बाजार समितीच्या वार्षिक कामगिरीच्या आधारावर मूल्यांकन करून राज्यभरातील बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी प्रकाशित करण्यात आली.

त्यानुसार पणन संचालनालया अंतर्गत स्मार्ट प्रकल्प अंमलबजावणी कक्ष (कृषी पणन) यांच्यामार्फत बाजार समित्यांमधील पायाभूत व इतर सेवा सुविधा निकषांसाठी ८० गुण, आर्थिक निकषांसाठी ३५ गुण, वैधानिक कामकाज निकषांसाठी ५५ गुण व इतर निकषांसाठी ३० गुण असे एकूण २०० गुण निश्‍चित करण्यात आले होते.

त्यानुसार प्रकल्प अंमलबजावणी कक्षाने ठरवून दिलेल्या गुणांकनानुसार लासलगाव बाजार समितीच्या सन २०२३-२४ या वर्षाच्या वार्षिक कामगिरीची पाहणी जिल्हा उपनिबंधक(सहकारी संस्था) नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निबंधक निफाड यांच्या कार्यालयाने करून वस्तुनिष्ठ गुणांकनाचा प्रस्ताव पणन संचालनालयातील स्मार्ट प्रकल्प अंमलबजावणी कक्षास सादर केला होता.

त्याप्रमाणे प्रकल्प अंमलबजावणी कक्षाने या प्रस्तावाची छाननी करून सन २०२३-२४ या वर्षाच्या वार्षिक क्रमवारीत लासलगाव बाजार समितीस एकूण २०० गुणांपैकी १५७.५ गुण दिले. राज्यस्तरीय क्रमवारीत चौथा तर नाशिक विभागात प्रथम क्रमांक दिलेला आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT