Papaya Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Papaya Farming : खानदेशात पपईखालील मोठे क्षेत्र रिकामे

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात पपई पीक परवडत नसल्याने मोठे क्षेत्र रिकामे झाले आहे. रिकाम्या केलेल्या क्षेत्रात बाजरी, कांदा आदी पिकांची लागवड शेतकरी करीत आहेत. पपईची खानदेशात सर्वाधिक सुमारे ५२०० हेक्टर एवढी लागवड नंदुरबारात २०२३-२४ च्या हंगामात झाली होती. त्यापाठोपाठ जळगावात सुमारे १२०० हेक्टरवर आणि नंदुरबारातही सुमारे एक हजार हेक्टरवर पपईची लागवड होती.

मागील वर्षी रोपे वेळेत उपलब्ध न झाल्याने अनेक शेतकऱ्यांची लागवड उशिरा किंवा एप्रिल, मे महिन्यात झाली. ज्यांनी जानेवारी, फेब्रुवारीत लागवड केली होती, त्या शेतकऱ्यांच्या क्षेत्रातून काढणी ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये सुरू झाली. परंतु उशिरा लागवडीच्या बागांमध्ये डिसेंबरमध्ये काढणी सुरू झाली. पपईचे दर ऑक्टोबरमध्ये ३५ ते ४० रुपये प्रतिकिलो, असे शेतकऱ्यांना जागेवर किंवा थेट खरेदीत मिळत होते.

नोव्हेंबरमध्ये दर सरासरी २० रुपये प्रतिकिलो, असे मिळाले. डिसेंबरमध्ये सरासरी दर सहा रुपये प्रतिकिलो, असे होते. डिसेंबरमध्ये दर ११, नऊ, आठ, सात व शेवटी चार रुपये प्रतिकिलो, असे झाले. या महिन्यातही सुरुवातीपासून प्रतिकिलो चार, तीन, अडीच रुपये प्रतिकिलोचा दर शेतकऱ्यांना थेट खरेदीत मिळत आहे.

दर कमी असतानाच काही शेतकऱ्यांच्या बागांत रोगराई वाढली. यामुळे उत्पादन घटले. तर अनेकांना कमी दर व काढणी खरेदीदार करीत नसल्यान्याने फटका बसला. पीक परवडत नसल्याने ते शेतकऱ्यांनी काढून फेकले. पपईची आवक खानदेशात सध्या ३५ ते ४० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता)एवढी आहे. ही आवक स्थिर आहे. त्यात पुढे आणखी काहीशी वाढ होईल.

३०० हेक्टरवरील पीक काढल्याचा अंदाज

खानदेशात नंदुरबार, धुळे जिल्ह्यात सुमारे ३०० हेक्टरवरील पपईचे पीक शेतकऱ्यांनी काढले आहे. त्यात बाजरी, कांदा यांची लागवड केली आहे. तर पपईचे बेवड केळीसाठी अनुकूल असल्याने अनेकांनी मार्च, एप्रिलमध्ये त्यात केळी लागवडीचे नियोजन केले आहे. जळगाव जिल्ह्यातही काही शेतकऱ्यांनी पीक काढल्याची माहिती आहे.

पपईची मागणी हिवाळ्यात अधिक असते. परंतु यंदा हिवाळ्यातही मागणी कमी राहील्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच खरेदीदारांची लॉबी दर पाडत असून, शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत. पपई पीक परवडत नसल्याने यंदा शेतकऱ्यांनी पपई लागवडीसाठी रोपांची बुकिंग टाळली आहे. यामुळे लागवड घटेल, असाही अंदाज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan Scheme : पी.एम.किसान योजना; अठराव्या हप्त्यास शेतकरी मुकणार, तेरा हजार खाती आधार लिंकविना

Indian Agriculture : शिळ्या कढीला ऊत

Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुका तीन टप्प्यांत

Budget Update : अर्थसंकल्पातून प्रत्येक समाज घटकाला न्याय : अजित पवार

Watershed Mismanagement Case : पाणलोट गैरव्यवहारप्रकरणी फौजदारी कारवाई करा

SCROLL FOR NEXT