Farmer Protest: पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे खरीप पिकांचे नुकसान झाल्याने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी, या मागणीसाठी स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (ता. १७) शेकडो शेतकऱ्यांनी जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली..जिल्ह्यात अनेक भागांत ५० दिवसांहून अधिक काळ पावसाचा खंड पडल्याने सोयाबीनसह खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज असल्याचे डिक्कर यांनी सांगितले. शासनाने केवळ पाहणी न करता प्रत्यक्ष मदतीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली..Farmer Relief Demands: शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार, शेतमजुरांना २५ हजार रुपयांची मदत द्या: आमदार रोहित पवार .जिल्ह्यात कोणत्याही अटींशिवाय दुष्काळ जाहीर करावा, नुकसान झालेल्या पिकांसाठी हेक्टरी एक लाख रुपये विशेष मदत आणि १०० टक्के पीकविमा द्यावा, सरसकट कर्जमाफी करावी, तसेच रब्बी हंगामासाठी नवीन पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली. .Drought In Maharashtra: महिनाभर पावसाचा खंड, शेतकरी चिंतेत, कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी.भूमिहीन शेतमजूर कुटुंबांना ५० हजार रुपये मदत आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. मागण्यांवर तातडीने निर्णय न झाल्यास दुष्काळग्रस्त शेतकरी व शेतमजुरांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा डिक्कर यांनी दिला..यावेळी उज्वल पाटील चोपडे, विठ्ठल वखारे, सुरेश तोटे, गौरव जळमकार, अमोल मारोडे, सागर वाघ, प्रणव धामोडे, मंगेश लव्हाळे, गोपाल वखारे, वैभव मुरूख, प्रमोद घोडे, अक्षय वाकोडे, विशाल चोपडे, दिगंबर वानखडे, घनश्याम ताटे, अभिषेक कोकाटे, तुषार जाधव, गणेश निर्मळ, रामकृष्ण गावंडे, सुनील बाहोदरे, वासुदेव पुंडे, अमोल आगरकर यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.