Kharif Crop Loss: खानदेशात खरिपात कोरडवाहू कापूस, सोयाबीन, ज्वारी आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पुढील काळात रब्बी हंगामातील पिकांवर शेतकऱ्यांची मदार राहणार आहे. मात्र, यंदा कमी पाऊसमानामुळे रब्बीची पेरणी कमी होण्याची शक्यता आहे..जळगाव जिल्ह्यात हरभऱ्याची सर्वाधिक सुमारे ८० ते ८५ हजार हेक्टरवर पेरणी होणार असून, जिल्ह्यात रब्बीची सुमारे ८५ ते ९० टक्के पेरणी होईल, असे चित्र आहे. .Khandesh Sowing Update: खानदेशात २५ टक्के पेरण्या; कापूस लागवड अपेक्षेपेक्षा कमी.पाऊसमान यंदा कमी आहे. जळगाव जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र सुमारे पावणेदोन लाख हेक्टर आहे. यंदा सुमारे एक लाख ४५ हजार हेक्टरपर्यंत पेरणी होईल, असा अंदाज आहे. गेल्या वर्षी पेरणी ११० टक्क्यांवर झाली होती. खानदेशात यंदा सुमारे तीन लाख ४० हजार हेक्टरवर रब्बी पेरणीची अपेक्षा आहे. धुळे जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र ६० हजार हेक्टर, तर नंदुरबारात सुमारे ४२ हजार हेक्टर आहे. या दोन्ही जिल्ह्यांतही रब्बीची पेरणी कमी होणार आहे..Rabi Sowing: हरभरा अधिक; गव्हाची पेरणी वाढतेय.गिरणा धरणाचा होणार आधारजळगाव जिल्ह्यात गिरणा धरणातून रब्बीसाठी पाणी मिळणार असल्याने गिरणा पट्ट्यात रब्बी हंगाम चांगला राहणार आहे. खानदेशात रब्बीची पेरणी एकूण दोन लाख ३० हजार हेक्टरवर नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत होईल, असा अंदाज आहे. त्यात सर्वाधिक क्षेत्र हरभरा पिकाचे राहणार आहे. त्यापाठोपाठ दादर ज्वारी, संकरित ज्वारी, मका आणि गहू यांची पेरणी होणार आहे. हरभरा, गहू आणि ज्वारीची पेरणी काळ्या कसदार जमिनीत ऑक्टोबरमध्येच करण्याचे नियोजन अनेक शेतकरी करीत आहेत. संकरित ज्वारी, बाजरी, मका आणि कांद्याची लागवडही अपेक्षेप्रमाणे होणार नाही. कमी पाऊसमानामुळे त्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे..मक्याचे क्षेत्र अधिक राहणारखानदेशात मक्याची सुमारे सव्वा लाख हेक्टरवर लागवड होऊ शकते. ज्वारीची पेरणी सुमारे ३० ते ३२ हजार हेक्टरवर होईल, अशी अपेक्षा आहे. गव्हाची पेरणीदेखील १५ ते १६ हजार हेक्टरपर्यंत होईल. जलसाठे सर्वत्र मुबलक नसल्याने गव्हाचा पेरा कमी राहण्याची शक्यता आहे. कांदा लागवडही कमी राहणार आहे. अनेक भागांत जलसाठे फेब्रुवारीतच कमी होण्याची शक्यता असल्याने कांदा लागवडीवर परिणाम होईल. धुळे जिल्ह्यातील लागवडही कमी राहण्याची शक्यता आहे..खानदेशात आगाप व उन्हाळ कांद्याची मिळून ४० ते ४२ हजार हेक्टरवर लागवड होते. धुळे जिल्ह्यात साधारण १८ ते २० हजार हेक्टरवर कांदा लागवड होते. मात्र, यंदा ही लागवड ३० ते ३५ टक्के कमी होण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे आठ ते नऊ हजार हेक्टर, धुळे जिल्ह्यात १२ ते १३ हजार हेक्टर, तर नंदुरबारात सुमारे सहा ते सात हजार हेक्टरवर कांदा लागवड अपेक्षित आहे. बाजरीची पेरणी जानेवारीच्या मध्यापर्यंत सुरू राहील. बाजरीची पेरणीदेखील सुमारे सात ते आठ हजार हेक्टरपर्यंत होईल, असे सांगण्यात आले. धुळे जिल्ह्यात अनेर व पांझरा प्रकल्पातून रब्बीसाठी पाणी सोडण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यातही वाघूर व हतनूर धरणातून पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे या धरणांच्या लाभक्षेत्रात रब्बी हंगाम बऱ्यापैकी राहणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.