Land Survey Agrowon
ॲग्रो विशेष

Land Survey : मृत व्यक्ती उपस्थित असल्याचे दाखवत केली जमिनीची मोजणी

Land Record Department : विशेष म्हणजे मोजणीवेळी उपस्थित असणाऱ्या व्यक्तीचे काही महिन्यापूर्वीच निधन झाले आहे. पण ते उपस्थित असल्याचे दाखवण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.

Team Agrowon

Solapur News : सात-बारा उताऱ्यावर नावे असलेल्या व्यक्तींना न बोलावताच जागेची परस्पर मोजणी केल्याप्रकरणी भूमिअभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक नितीन सावंत आणि कार्यालयातील अन्य तिघांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे मोजणीवेळी उपस्थित असणाऱ्या व्यक्तीचे काही महिन्यापूर्वीच निधन झाले आहे. पण ते उपस्थित असल्याचे दाखवण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.

या प्रकरणी सात-बारा उताऱ्याचे पोटहिस्से करून अधिकाराचा गैरवापर करून फसवणूक केल्याची फिर्याद सुनील वसंतराव पोतदार (रा. शुक्रवार पेठ, सोलापूर) यांनी सदर बझार पोलिसात दिली आहे.

सोलापुरातील मजरेवाडी परिसरातील मोजणीत हा प्रकार घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, की सोलापूरच्या हद्दवाढ भागातील मजरेवाडी परिसरात बिनशेती खुली जागा सर्व्हे नंबर ३०६-१ यात नवीन सर्व्हे नंबर १५४-१ याने एकूण क्षेत्र ४ हेक्टर ७६ आर एवढे आहे,

या मिळकतीवर फिर्यादी पोतदार व त्यांचे पाच चुलत भावांची वारसाहक्काने नावे लागली आहेत. परंतु याची खातरजमा न करताच त्या जागेची भूमिलेख कार्यालयातील शासकीय अधिकाऱ्यांनी मोजणी केली.

विशेष बाब म्हणजे अर्जदारास आणि उताऱ्यावरील कोणालाही त्याची कल्पना वा नोटीस दिली गेली नाही. त्यांच्या परस्परच जमिनीची मोजणी केली. विशेष म्हणजे यातील मोजणीवेळी जो उपस्थित होता, असे म्हटले आहे. त्यांचे निधन मोजणीच्या काही महिन्यांपूर्वीच झाले आहे.

याबाबतच्या कागदपत्रासह फिर्यादी पोतदार यांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच उताऱ्याचे पोटहिस्से करून चौघांनी अधिकाराचा गैरवापर करून अन्य मिळकतदारांना फायदा करून दिल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Rate: खानदेशात दर्जेदार कापसाचा दर प्रति क्विंटल ७२०० रुपयांपर्यंत

Farmer Crisis: मोर्शी, वरुड तालुक्यांतील शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात

Onion Auction: लासलगाव, पिंपळगाव बसवंतमध्ये कांद्याचे लिलाव सुरू

Rabi Season: रब्बी हंगामासाठी पाऊस लाभदायक

Rain Forecast: राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT