Land Survey : जमीन मोजणी प्रकरणाचा ९० दिवसांत निपटारा करा

Bhumapan Department : शासनाच्या स्वामित्व योजना या गावठाण नगर भूमापनबाबत महत्त्वाकांक्षी योजनेचा आढावा घेण्यात आला.
Land Survey
Land SurveyAgrowon
Published on
Updated on

Nashik News : भूमापन विभागाकडे मोजणीसाठी दाखल होणाऱ्या प्रकरणांचा तीन महिन्यांच्या शिकारी कार्यालय आत निपटारा करण्याची सूचना जमाबंदी आयुक्त तथा भूमिअभिलेख (पुणे) संचालक सचिंद्रप्रताप सिंह यांनी दिली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात भूमिअभिलेख कार्यालयाची विभागीय आढावा बैठक झाली. जिल्हाधिकारी जलज शर्मा,भूमिअभिलेख उपसंचालक महेश इंगळे यांच्यासह नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे व नंदुरबार या पाच जिल्ह्यांतील अधिकारी उपस्थित होते.

Land Survey
Land Survey : रोवरने जमीन मोजणी होणार गतीने

शासनाच्या स्वामित्व योजना या गावठाण नगर भूमापनबाबत महत्त्वाकांक्षी योजनेचा आढावा घेण्यात आला. तसेच, भूमिअभिलेख विभागाकडील व्हर्जन २, ई-चावडी, बल्क साईन, आकारबंद, एकत्रीकरण योजना आदी योजनांवर बैठकीत सखोल चर्चा झाली.

Land Survey
Online Land Survey : जमीन मोजणीच्या ऑनलाइन कटकटीला शेतकरी वैतागले

याबाबत योग्य नियोजन करून कार्यवाही करण्याच्या सूचना सचिंद्रप्रताप सिंह यांनी विभागप्रमुखांना या वेळी दिल्या. त्याचप्रमाणे भूमिअभिलेखांचे स्कॅनिंग, डिजिटायजेशन आणि संगणकीकरण करून आवश्यक नकला व नकाशे नागरिकांना त्वरेने उपलब्ध करून देणे,

फिफो (प्रथम अर्ज प्रथम निर्गती) या कार्यप्रणालीचा वापर करून नगरभूमापन विभागाकडील फेरफार प्रकरणे जलद गतीने निकाली काढून नागरिकांना जलद सेवा देण्याचे निर्देश त्यांनी विभागप्रमुखांना दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com