Agriculture Land Agrowo
ॲग्रो विशेष

Bhumi Abhilekh Portal : पोर्टलवर ८३ गावांचे दर्शन दुर्लभ

Land Record : भूमी अभिलेख पोर्टलवरून जिवती तालुक्यातील तब्बल ८३ गावांचे दर्शन दुर्लभ झाले आहे. त्याचा परिणाम शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांपासून मुकावे लागत आहे.

Team Agrowon

Chandrapur News : भूमी अभिलेख पोर्टलवरून जिवती तालुक्यातील तब्बल ८३ गावांचे दर्शन दुर्लभ झाले आहे. त्याचा परिणाम शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांपासून मुकावे लागत आहे.

या संदर्भाने शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. त्याची दखल घेत आता कृषी विभागाने आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला आहे. या पत्रव्यवहारातून तोडगा निघावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे.

जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर जिवती तालुका आहे. उद्योग नसल्याने या भागातील नागरिक शेती करतात. त्यातही सिंचनाची सुविधा नाही. त्यामुळे पावसाच्या भरोवशावर शेती करावी लागते. आता खरीप हंगाम सुरू झाला आहे. हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी पिकांच्या संरक्षणासाठी पीकविमा काढतात. त्यासाठी शेतकऱ्यांना सात-बारासह अन्य कागदपत्रांची गरज भासत आहे.

भूमिअभिलेख कार्यालयाच्या पोर्टलवर तालुक्यातील ८३ गावेच नाही. त्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे सात-बारा ऑनलाइन झाले नाही. आता राज्य शासनाने शेतकऱ्यांना विविध योजनांच्या लाभासाठी अॅग्रीस्टिकमध्ये नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. त्यासाठी सात-बारा ऑनलाइन करणे आवश्यक आहे. मात्र, पोर्टलवर गावे नसल्याने सात-बारा ऑनलाइन करायचा तरी कसा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

पीकविम्याची अंतिम तारीख ३१ जुलै आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या सेवा केंद्रावर गर्दी करीत आहे. पीकविम्याच्या पोर्टलवर जिवती तालुक्यातील रेकॉर्ड अद्ययावत झाले नाही. पोर्टलवर ऑनलाइन फॉर्म भरत असताना ‘स्टेट लॅंड रेकॉर्ड पोर्टर एरर’ असा संदेश येत आहे.

त्यामुळे या तालुक्यातील शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, याबाबत अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहे. पीकविमा भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै असल्याच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने आता आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला आहे. त्यावर आयुक्त काय निर्णय घेतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Policy Commitee: कांदा धोरण समिती महिनाभरानंतरही कागदावरच

Maize Cultivation: मराठवाड्यात मक्याची विक्रमी ३ लाख ४८ हजार हेक्टरवर लागवड

Suraj Chavhan Resign: राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांची हकालपट्टी

Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूरवरून गदारोळ

Respect For Women: स्त्रीतत्त्वाला समाजात प्रतिष्ठा हवी : अभिजित पवार

SCROLL FOR NEXT