Jalgaon APMC  Agrowon
ॲग्रो विशेष

Jalgaon APMC : बाजार समितीत शेतकरी निवासासह विविध सुविधांचा अभाव

APMC News : बाजार समितीत धान्य व फळ भाजी मार्केट यार्डात अतिक्रमणांची समस्या वाढली आहे. यातच शेतकऱ्यांसाठी शेतकरी निवास व अन्य सुविधांचा अभावही आहे.

Team Agrowon

Jalgaon News : बाजार समितीत धान्य व फळ भाजी मार्केट यार्डात अतिक्रमणांची समस्या वाढली आहे. यातच शेतकऱ्यांसाठी शेतकरी निवास व अन्य सुविधांचा अभावही आहे. बाजार समितीने धान्य मार्केट यार्डातील मुख्य द्वारानजीकच्या आपल्या एका इमारतीत बँकेला भाडेतत्त्वावर जागा दिली आहे.

या बँकेच्या वरच्या भागात शेतकरी निवास आहे. पण त्याची दैना झाली आहे. त्यात पाणी, शौचालय व विश्राम गृहात कुठल्याही सुविधा नाहीत. त्यातील खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत.

तसेच धूळ आहे. त्याची कुठलीही साफसफाई केली जात नाही, अशी स्थिती आहे. फळ व भाजीपाला मार्केट यार्डातही शेतकरी निवास किंवा विश्रामगृहाची व्यवस्था हवी आहे. खानदेशातील सर्वांत मोठी बाजार समिती म्हणून जळगाव बाजार समितीची ओळख आहे.

भाजीपाला मार्केट यार्डात रात्री - मध्यरात्री विविध भागांतील शेतकरी आपला भाजीपाला, शेतीमाल घेऊन लिलावासंबंधी पोचतात. कारण लिलाव सकाळी सहा वाजेपासून सुरू होतात. छत्रपती संभाजीनगरातील सिल्लोड, सोयगाव, धुळ्यातील साक्री, धुळे आदी भागांतूनही शेतकरी येतात. त्यांच्यासाठी शुद्ध पिण्याचे पाणी, विश्रामगृह आदी सुविधा बाजार समितीने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

संघटनांची कार्यालये व सेवा-सुविधा

बाजार समितीत फळ व भाजीपाला मार्केटमधील अडतदारांसाठी स्वतंत्र कार्यालय आहे. धान्य मार्केटमध्येही स्वतंत्र कार्यालय अडत असोसिएशनसाठी आहे. तेथे शौचालय व अन्य सुविधाही आहेत. परंतु शेतकऱ्यांसाठी मात्र शौचालयदेखील बाजार समितीत नाही. शेकडो शेतकरी रोज बाजार समितीत येतात, पण त्यांच्यासाठी शुद्ध पाण्याची प्रशस्त सुविधा बाजार समिती प्रशासनाने केलेली नाही, अशी नाराजी शेतकरी व्यक्त करीत आहेत.

अतिक्रमणेही जैसे थे

बाजार समितीत अतिक्रमणांची समस्या जैसे थे आहे. चहा-पान टपऱ्यांची संख्या वाढलीच आहे. तसेच मुख्य प्रवेशद्वारानजीक नेहमी रिक्षाचालक व अन्य वाहनधारकांची गर्दी असते. फळ व भाजीपाला मार्केट यार्डात रोजच मुख्य प्रवेशद्वारानजीक शेतकरी व रिक्षाचालक यांच्यात वाट काढण्यावरून वाद होतात.

याशिवाय गटारी व अन्य सुविधादेखील बाजार समितीत नसल्याने दुर्गंधीचे साम्राज्य असते, अशा तक्रारी शेतकरी करीत आहेत. या समस्यांबाबत शेतकऱ्यांनी काही संचालकांकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु प्रशासन व संचालक फक्त बाजार समितीचा महसूल कसा वाढेल याकडे लक्ष देतात. शेतकऱ्यांच्या अडचणींकडे दुर्लक्ष केले जाते, असाही मुद्दा उपस्थित केला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT