Leopard Attack Agrowon
ॲग्रो विशेष

Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात मजूर गंभीर जखमी

Team Agrowon

Jalgaon Leopard News : कुरंगी (ता. पाचोरा) येथील शेतशिवारात बिबट्याने अल्पभूधारक शेतकऱ्याच्या गाईचा फडशा पाडला असून, शेतात काम करणाऱ्या तरुण मजूर हल्ला करून त्याला जबर जखमी केले. तरुणाने आरडाओरड केल्याने त्याचा जीव वाचला.

युवराज राजधर पाटील (रा. कुरंगी) या शेतकऱ्याच्या शेतात दोन गाई, दोन बैल सावलीत झाडाखाली बांधलेले होते. दरम्यान, बिबट्या गाईचा फडशा पाडत असताना शेतकरी युवराज पाटील शेतात जाताच बिबट्याने तिथून पळ काढला.

शेजारील अप्पा तापीराम पाटील यांच्या लिंबूच्या शेतात घुसला. तेथे शेतात काम करणारा राजेश बापू लोहार (वय २६) त्याच्या मित्रासोबत शेळीचा चारा काढत असताना बिबट्याने त्या तरुणावर जोरदार हल्ला चढवला. त्या हल्ल्यात राजेश लोहार याच्या चेहऱ्यावर पंजा मारून त्याच्या दोन्ही हातांना चावा घेतला.

सोबत काम करणारे मित्र असल्याने त्यांनी जोरात आरडाओरड केल्याने बिबट्याने तिथून पळ काढला. या जीवघेण्या हल्ल्यात राजेश जबर जखमी झाला असून, त्याला उपसरपंच शालिग्राम पाटील, सदस्य अविनाश कोळी, तंटामुक्तीचे अध्यक्ष नामदेव पाटील, अजय जयस्वाल यांनी जखमी अवस्थेत नांद्रा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

कुरंगी येथील सरपंच सीमा पाटील यांनी पाचोरा वन विभागाशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क करून या घटनेची माहिती दिली. तत्काळ वनपरीक्षेत्र अधिकारी अमोल पंडित, वनपाल पी. बी. देवरे, वनरक्षक प्रकाश सूर्यवंशी, वाहनचालक सचिन कुमावत यांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमी मजुराची विचारपूस करून घटनेची संपूर्ण माहिती जाणून घेतली.

पंचनामा करण्यासाठी वन विभागाचे पथक सोनटेक शिवारात पंढरीनाथ पाटील, गणेश पाटील, अविनाश कोळी यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला.

हिंस्र प्राण्यांचे हल्ले सुरूच

दरम्यान, चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे- दरेगाव रस्त्यावरील शेतातील खळ्यात शेळ्यांवर गेल्या आठवड्यात हिंस्र प्राण्याने हल्ला करून दोन शेळ्या ठार केल्या होत्या. त्यानंतर दरातांडा (ता. चाळीसगाव) येथेही तीन शेळ्यांचा फडशा पाडला. या परिसराच बिबट्या असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

वन विभागाने पिंजरा लावला

दरम्यान बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून ज्या ठिकाणी जनावरांचा फडशा पाडला आहे, त्या ठिकाणी रात्री वन विभागाकडून पिंजरा लावण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : लातूर जिल्ह्याला अतिवृष्टीची भरपाई मंजूर

Buffalo Conservation : वारणाच्या जातिवंत म्हैस संवर्धन, पैदास योजनेतून म्हशी वितरणास प्रारंभ

Cotton Crop Damage : अतिपावसाने कापसाला कोंब

Crop Insurance : विमा कंपनीला पीक नुकसानीच्या सव्वा लाख पूर्वसूचना

Crop Loan : खानदेशात पीककर्ज वितरणात राष्ट्रीय बँका मागे

SCROLL FOR NEXT