Sugar Commissioner agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Commissioner : कुणाल खेमनार यांची साखर आयुक्तपदी नियुक्ती, राज्यातील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या

Sugar Commissioner Transfers : साखर आयुक्त अनिल कवडे हे ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या जागी कुणाल खेमनार यांची नियुक्ती झाली आहे.

sandeep Shirguppe

Maharashtra News : महापालिका आयुक्तांच्या बदलीनंतर मंगळवारी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, विकास ढाकणे यांच्या बदलीचे आदेश राज्य सरकारने काढले, तर नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी यांची महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. कुणाल खेमनार यांची साखर आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांची राज्याचे सहकार आयुक्त म्हणून, तर अनिल कवडे यांची साखर आयुक्त म्हणून मागच्या महिन्यात बदली करण्यात आली होती. दरम्यान अवघ्या एका महिन्यात साखर आयुक्तांची बदली होत आहे. मावळते साखर आयुक्त अनिल कवडे हे ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या जागी कुणाल खेमनार यांची नियुक्ती झाली आहे.

डॉ. कुणाल खेमनार यांची २१ ऑगस्ट २०२० रोजी पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. तीन वर्ष पाच महिने ते पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त होते. या कालावधीत त्यांनी पुणे महापालिकेचे विविध प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे.

राज्य सरकारने निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महत्त्वाच्या पदांवरील अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश मंगळवारी काढण्यात आले. मुंबई महानगरपालिकेतून हटवण्यात आलेल्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांची मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ठाण्याचे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने दणका दिल्यानंतर राज्य सरकारने आज तेरा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. पण यातील काहींचा नियुक्तीचा तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण नव्हता. मुंबई महापालिकेतून अश्विनी भिडे यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनाही हटवण्यात आले होते. आता वेलारासू यांच्या जागी अभिजित बांगर यांची नियुक्ती झाली आहे. राजेश नार्वेकर यांची नियुक्ती सहकार व निबंधक सहकारी संस्थेच्या (पुणे) आयुक्तपदी झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra River Rejuvenation: अखेर नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन

POCRA Research Agreement: ‘पोकरा’अंतर्गत संवर्धित शेतीसाठी संशोधन करार

Supe Water Supply Scheme: डोक्यावरील हंडा उतरणार !

Revenue Officer Corruption: उपळाईचा मंडल अधिकारी लाच घेताना अटकेत

Rural Development: लोकाभिमुख होऊन गावांची विकासकामे करा: ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे

SCROLL FOR NEXT