Krushna River Pollution agrowon
ॲग्रो विशेष

Krushna River Pollution : कृष्णा नदीला विषारी विळखा, स्वच्छतेसाठी ८८० कोटींचा निधी मंजूर

Krishna river Sangli : साखर कारखाने, दूध संघ, मळीमिश्रित, केमिकल मिश्रित आणि साडपाण्यामुळे कृष्णा नदीला प्रदूषणाचा विळखा पडला आहे.

sandeep Shirguppe

Sangli Krushna River News : साखर कारखाने, दूध संघ, मळीमिश्रित, केमिकल मिश्रित आणि साडपाण्यामुळे कृष्णा नदीला प्रदूषणाचा विळखा पडला आहे. कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा अभ्यास करण्यासाठी केंद्र शासनाच्या योजनेतून निधी मंजूर झाला आहे. त्याचा अहवाल सादर झाल्यानंतर प्रदूषणमुक्तीसाठी काम सुरू होईल.

राज्यासाठी सुमारे ८८० कोटी रुपये मिळणार आहेत, अशी माहिती सांगली पाटबंधारे मंडळाच्या कार्यकारी अभियंत्या ज्योती देवकर यांनी दिली.

यावेळी खासदार संजय पाटील म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत कृष्णा नदीच्या प्रदूषणाचे प्रमाण खूपच वाढले आहे. साखर कारखाने, दूध संघ, तेल उद्योग, केमिकल फॅक्टरी यांनी आपल्या प्रदूषित पाण्याची विल्हेवाट लावण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते विषारी पाणी कृष्णा नदीत सोडण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत.

कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीरच आहे. नदीला विषारी विळखा पडतो आणि कधीतरी त्याला भिडावेच लागणार आहे. मी त्यासाठी आग्रही भूमिका घेईल, असे खासदार संजय पाटील यांनी सांगितले.

यानंतर कार्यकारी अभियंत्या ज्योती देवकर म्हणाल्या, केंद्र शासनाने महाराष्ट्रातील नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी जवळपास तीन हजार २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये कृष्णा नदीचे कन्हाड ते राजारापूर बंधाऱ्यापर्यंत प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी ८८० कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. या निधीतून नदीतील गाळ काढण्यासह सांडपाणी व्यवस्थापनावर काम करण्यात येणार आहे.

शंभुराज देसाई यांची तक्रार : संजय पाटील

कोयना धरणातून पाणी सोडण्याबाबत अजूनही काहींची लोकांना नागविण्याची भूमिका घेतली: जात आहे. मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो आहे. त्यांनी पाणी सोडण्यात अडचण असता कामा नये, असे स्पष्ट केले आहे.

तरीही, काही घोळ सुरू आहे. अधिकाऱ्यांवर दबाव आहे. आता अधिक टोकाला जाण्याची वेळ येऊ नये, असा इशारादेखील खासदार संजय पाटील यांनी साताऱ्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांचे नाव न घेता दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Crop Damage : मुसळधारेने काही तासांत होत्याचे नव्हते

Onion Rate Crisis : कशी फुटेल कांदादर कोंडी?

Fertilizer Stock Mismatch : खत विक्री, प्रत्यक्ष साठ्यात तफावत असल्यास कारवाई

Onion Storage Rot : चाळीस टक्के कांद्याची चाळीतच नासाडी

ICAR Farmer Award : ‘आयसीएसआर’ शेतकऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणार

SCROLL FOR NEXT