Krishna River Sangli agrowon
ॲग्रो विशेष

Krishna River Sangli : कृष्णा नदी पुन्हा एकदा कोरडी, शेतीसह नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

Koyna Dam : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणातून सांगली जिल्ह्याला पाण्याची व्यवस्था होत असते.

sandeep Shirguppe

Agriculture Sangli News : यंदा पाऊस कमी झाल्याने धरणातील पाण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाकडून करण्यात येत आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणातून सांगली जिल्ह्याला पाण्याची व्यवस्था होत असते. परंतु यंदा कोयनेतही पुरेसा पाणीसाठी नसल्याने कृष्णा नदी कोरडी पडला आहे.

याचबरोबर कोयना धरणातून सोडलेले पाणी टेंभू आणि ताकारी उपसा सिंचन योजनांसाठी उचलले जात असल्याने नदीचा प्रवाह खोळंबला आहे. परिणामी, सांगली बंधाऱ्याजवळ कृष्णा नदी पुन्हा एकदा कोरडी पडली आहे.

नदीतील वाळू दिसू लागली आहे. त्यानंतर आता पाटबंधारे विभागाने कसबे डिग्रज बंधाऱ्यातून पाणी सोडले आहे. यावर्षी हे पुन्हा पुन्हा घडत असल्याने सांगलीकरांनी संताप व्यक्त केला आहे.

गेल्यावर्षी गणपती उत्सवापासून सातत्याने कृष्णा नदी कोरडी पडण्याचे सत्र सुरु आहे. दिवाळीत तीच वेळ आली होती. त्यात राजकीय हस्तक्षेपाचे कारण समोर आले होते. वाद झाला होता. त्यानंतर परिस्थिती सुधारेल, अशी अपेक्षा होती. तसे घडलेले दिसत नाही.

कोयना धरणातून टेंभू, ताकारी योजनांच्या आवर्तनासाठी पाणी सोडले आहे, मात्र त्याचा वेग कमी आहे. परिणामी, सांगलीपर्यंत पाणी पोहचत नाही. आता डिग्रज बंधाऱ्यातून पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे.

पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर म्हणाल्या, "सिंचन योजनांसाठी पाणी उपसा सुरु असल्याने सांगलीपर्यंत पाणी येण्यात अडचणी होत्या. आम्ही डिग्रज बंधाऱ्यातून पाणी सोडले आहे. ते सांगलीत पोहचेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT