Sangli Jat Bull Market : 'या' जत्रेची खासियत बैलांचा बाजार, तब्बल ३ कोटींवर उलाढाल

sandeep Shirguppe

सांगली जत तालुका

सांगली जिल्ह्याच्या पूर्वेला जत हा दुष्काळी तालुका आहे. जिद्द आणि कष्टाच्या जोरावर इथल्या शेतकऱ्यांनी शेतीत प्रगती साधली आहे.

Sangli Jat Bull Market | agrowon

खिलार जनावर

या तालुक्याचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याच्या गोठ्यात एक खिलार जनावर असतचं.

Sangli Jat Bull Market | agrowon

यल्लमादेवी यात्रा

जत शहराच्या दक्षिणेला गंधर्व नदीच्या काठी श्री यल्लमादेवीची मार्गशीष महिन्यात श्री यल्लम्मादेवीची यात्रा भरते.

Sangli Jat Bull Market | agrowon

जनावर बाजार

या यात्रेच्या निमीत्ताने शेतकऱ्यांच्या हितासाठी जनावरे बाजार आणि प्रदर्शन भरवण्याची संकल्पना त्यांनी मांडली.

Sangli Jat Bull Market | agrowon

लाखोंची जनावरे

यात्रा तीन दिवस चालते. यामध्ये जनावरांचा मोठा बाजार होतो. या जनावरांच्या बाजारात लाखो रुपयांची जनावरे असतात.

Sangli Jat Bull Market | agrowon

शेतकऱ्यांकडून खरेदी विक्री

थेट शेतकऱ्यांकडून खरेदी- विक्री केली जाते यामध्ये कोणीही मध्यस्थी नसतो, यात शर्यतीचे खोंड, वळू, शेतीकामासाठीचे बैल आदी येत असतात.

Sangli Jat Bull Market | agrowon

अनेक राज्यातून पशुपालक

पुणे, नगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, सांगली, कोल्हापूर, सातारा, कर्नाटकातील विजापूर, इंडी, जमखंडी, गोकाक, अथणी, विजापूर, बेळगाव येथून पशुपालक येतात.

Sangli Jat Bull Market | agrowon

लाखोंची किंमत

यामध्ये खोंड- ६० हजार ते एक लाख, शर्यतीचा खोंड- ६ ते ९ लाख, शेतीकामाचे बैल (जोडी)- ३ ते ४ लाख. वळू- ४ ते ५ लाख दर येतो.

Sangli Jat Bull Market | agrowon

कोट्यावधींची उलाढाल

१० ते १५ हजार जनावरांची खरेदी विक्री झाली तर तर सुमारे तीन- चार कोटींची उलाढाल झाली असल्याचा अंदाज बाजार समितीने व्यक्त केला.

Sangli Jat Bull Market | agrowon

वळूंनाही किंमत

शेतीकामाच्या बैलांचे दरही १५ हजारांपासून ६० हजारांनी चढे होते. जातिवंत वळूंचीही चांगली खरेदी झाली.

Sangli Jat Bull Market | agrowon