Sugarcane Rate  
ॲग्रो विशेष

Sugarcane Rate : नागनाथ अण्णांनी उसाला चांगला दर देऊन आदर्श निर्माण केला

Sugar Factory : उसाच्या दरासाठी आंदोलने सुरू होण्यापूर्वीच क्रांतिवीर नागनाथ अण्णांनी उसाला चांगला दर देऊन आदर्श निर्माण केला होता,

Team Agrowon

Sangli News : उसाच्या दरासाठी आंदोलने सुरू होण्यापूर्वीच क्रांतिवीर नागनाथ अण्णांनी उसाला चांगला दर देऊन आदर्श निर्माण केला होता, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी वाळवा येथे क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या तेराव्या स्मृतिदिन सभेत केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतिवीर नागनाथांना व कुसुमताई नायकवडी यांच्या समाधीस्थळी आदरांजली वाहण्यात आली. नागनाथअण्णांची नात मधुरा वैभव नायकवडी हिने एम.बी.बी.एस. पदवी मिळाल्याबद्दल तिचा प्रमुख पाहुण्यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

मंत्री आबिटकर म्हणाले, ‘‘पारतंत्र्यात असताना क्षितिजा पलीकडचे जग पाहण्याचे धाडस करून ते मिळवण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांना एकत्रित करून क्रांतिवीर नागनाथ अण्णांनी प्रचंड मोठा लढा दिला. सांगली, सातारा जिल्ह्याप्रमाणे अण्णांनी कोल्हापुरातही मोठे काम केले. कोल्हापुरातही त्यांना मानणारा प्रचंड मोठा वर्ग आहे.

स्वातंत्र चळवळीत काम करणाऱ्या लहानातल्या लहान व्यक्तीला सुद्धा ते कधी विसरले नाहीत. देश स्वतंत्र झाल्यानंतर अण्णा थांबले नाहीत. त्यांनी सामान्य लोकांच्या हितासाठी अनेक चळवळी उभा केल्या.’’

माजी खासदार संजय मंडलिक म्हणाले, ‘‘देश सेवा करत असताना क्रांतिवीर अण्णांनी जीवनात अनेक त्याग केले. जनतेसाठी त्यांनी स्वतंत्र्यानंतरही लढा चालू ठेवला.’’ हुतात्मा कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी आपल्या प्रास्ताविकात क्रांतिवीर नागनाथ अण्णांच्या जीवनपट उलघडला. गौरव नायकवडी यांनी आपल्या मनोगतात क्रांतिवीर नागनाथ अण्णांच्या कार्यक्रमासाठी राज्यातील अनेक पक्षाचे, अनेक दिग्गज नेते सर्व भेदभाव विसरून वाळव्यात येत असतात, असे सांगितले.

सूत्रसंचालन प्रा. राजा माळगी यांनी केले. प्रा. सुषमा नायकवडी, नंदिनी नायकवडी, विशाखा कदम, विरधवल नायकवडी, केदारज्योती नायकवडी, शिवाजी काळुंगे, कार्यकारी संचालक राम पाटील, हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी, धरणग्रस्त, दुष्काळग्रस्त, चळवळीचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dhekale Land Dispute: ढेकाळेतील उपकेंद्राच्या जमिनीवरून नवा पेच

Nanded Farmer Crisis: खरीपापूर्वीच शेतकऱ्यांसमोर अडचणींचा डोंगर

Raigad Unseasonal Rain: रायगड जिल्हा १२ तास अंधारात

Government Employees DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्त्यात २ टक्के वाढ

Farmer Loss: मदनसुरी परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात

SCROLL FOR NEXT