Sugarcane Rate : जो जास्त दर देईल, त्याच कारखान्याला ऊस ; माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांची भूमिका

Sugarcane Crushing : राज्यात यंदा उसाची पळवापळवी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तसेच ऊस उत्पादनाचा खर्चही वाढलेला आहे. रासायनिक खताच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत.
Sugarcane Rate
Sugarcane Rateagrowon
Published on
Updated on

Sugarcane Farming : नातेपुते ः राज्यात यंदा उसाची पळवापळवी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तसेच ऊस उत्पादनाचा खर्चही वाढलेला आहे. रासायनिक खताच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. मशागतीच्या किमतीही दुप्पट झाला आहे. त्यामुळे शेतकरी जो कारखाना लवकरात लवकर ऊस तोडून नेईल. दहा दिवसांत उसाचे बिल देईल. तेही इतरांपेक्षा जास्त दर देईल, त्याला देण्यासाठी आग्रही दिसत आहेत.

माळशिरस तालुक्यातील सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील साखर कारखाना, श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखाना, माळीनगर सहकारी साखर कारखाना, सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखाना व चांदापुरीचा साखर कारखाना यांनी सरासरी दर पहिल्या महिन्यात २७०० ते २७५० प्रतिटन दिला आहे. तालुक्यातील ऊस बाहेर जात आहे लक्षात आल्यानंतर हाच दर २८५० ते २९०० रुपये केलेला आहे.

Sugarcane Rate
Sugarcane Season : माळीनगर कारखान्याला ऊस देऊन सहकार्य करा

तरीही माळशिरस तालुक्यातील किमान सहा ते सात लाख मे. टन ऊस लगतच्या फलटण व बारामती तालुक्यातील कारखान्यांना गेला आहे. या दोन्ही साखर कारखान्यांचे २६ जानेवारी अखेरीस गाळप पाच लाख टन झाले आहे. श्रीराम साखर कारखाना व साखरवाडीचा श्री दत्त साखर कारखाना यांचे हे पाच लाख गळीत झाले आहे. माळशिरस तालुक्यातून वाई येथील किसनवीर साखर कारखान्यास ऊस गेलेला आहे व सध्या ऊस जात आहे.

ऊसदराच्या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने लगतच्या साखर कारखान्यांची तुलना करता फारच पिछाडीवर आहेत.माळशिरस तालुक्याच्या सीमेवरील बारामती तालुक्यातील सोमेश्वर, माळेगाव, भवानीनगर साखर कारखान्यांचा उसाचा दर ३४०० ते ३५०० रुपये मे. टन आहे. तसेच फलटण तालुक्यातील सर्व साखर कारखान्याचा दर पहिला हप्ता ३१०० रुपये आहे. म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांपेक्षा चारशे रुपयांनी जास्त आहे.  याकारणांमुळे राजकीय निष्ठा वेगळ्या आणि आपला ऊस उत्पादनाचा खर्च विचारात घेऊन राजकीय निष्ठा बाजूला ठेवून प्रत्येक शेतकरी जेथे दर जास्त मिळेल तेथे ऊस पाठवू लागला आहे.

तालुक्यातील कारखान्यांचे गाळप

सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील साखर कारखान्याचे गाळप चार लाख ९१ हजार झालेले आहे. पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे गाळप पाच लाख ६४ हजार टन झाले आहे. माळीनगर कारखान्याचे २ लाख ४३ हजार, सदाशिवनगर येथील श्री. शंकर साखर कारखान्याचे दोन लाख दहा हजार मे. टन तर चांदापुरीचेही दोन लाख टन गाळप झाले आहे. याउलट फलटण तालुक्यातील सर्व साखर कारखान्याचे गाळप पाच लाख टनाच्या पुढे झालेली आहे. हे वास्तव आहे.

माझा नातेपुते हद्दीत पावणेदोन एकर ऊस होता. या उसासाठी मला लवकरात लवकर जो उसाला तोड देईल त्या कारखान्याला मी ऊस देणार होतो. किसनवीर सहकारी साखर कारखाना भुईंज (ता. वाई) कारखान्याची उसाला तोड त्वरित मिळाली. त्यामुळे ऊस या कारखान्याला दिला आहे. येथे पहिली उचल प्रतिटन तीन हजार रुपये मिळणार आहे.

- राहुल माणिक पांढरे, शेतकरी, नातेपुते

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com