Sugarcane Crushing Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Crushing : ‘क्रांती अग्रणी’ १२ लाख टन ऊसगाळप करणार

यंदा क्रांती कारखान्याचे विस्तारीकरण पूर्ण झाले आहे. येत्या हंगामात १२ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. यासाठी १५ हजार हेक्टर क्षेत्राची नोंद आवश्यक आहे. यंदा उसाचे क्षेत्रही पुरेसे आहे.

Team Agrowon

Sangli News : यंदा क्रांती कारखान्याचे विस्तारीकरण पूर्ण झाले आहे. येत्या हंगामात १२ लाख टन ऊस गाळपाचे (Sugarcane Crushing) उद्दिष्ट आहे. यासाठी १५ हजार हेक्टर क्षेत्राची नोंद आवश्यक आहे. यंदा उसाचे क्षेत्रही पुरेसे आहे.

तोडणी यंत्रणेची होणारी फसवणूक टाळण्यासाठी कारखान्याने गोपीनाथ मुंडे महामंडळाकडे त्यांचे शुल्क भरून नोंदणी केली आहे, अशी माहिती आमदार अरुण लाड यांनी दिली.

येथील क्रांती कारखान्‍याच्‍या गळीत हंगाम २०२२-२३ या २१ व्‍या गाळप हंगामाचा तोडणी-वाहतूक करारांचा प्रारंभ अध्यक्ष आमदार अरु‍ण लाड यांच्या हस्‍ते पार पडला, त्या वेळी ते बोलत होते. जिल्‍हा बँकेचे माजी संचालक किरण लाड, कार्यकारी संचालक सी. एस. गव्हाणे प्रमुख उपस्थित होते.

यंदाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारांनी प्रतिकोयता योग्‍य रक्‍कम पुढे द्यावी, जेणेकरून ती पूर्ण फिटेल आणि तोडणी कामगार वेळेत आपल्‍याला उपलब्‍ध होतील, याची दक्षताही घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

‘क्रांती’ने ऊस विकासाच्या विविध सुविधा राबविल्‍यामुळे एकरी उत्‍पादन वाढले आहे. कारखाना अन्य देणी वेळेत देत आला आहे. सर्व वाहतूक कंत्राटदारांनी करार लवकरात लवकर पूर्ण करून या हंगामात चांगल्‍या प्रतीचा ऊस गाळपास आणावा.

या वेळी प्रातिनिधिक स्वरूपात करार प्रारंभ करण्यात आला. सी. एस. गव्हाणे यांनी प्रास्ताविक केले. सचिव अप्पासाहेब कोरे यांनी आभार मानले.

संचालक जयप्रकाश साळुंखे, जयवंत कुंभार, कुंडलिक थोरात, शीतल बिरनाळे, अंकुश यादव, पोपट संकपाळ, संदीप पवार, शेती अधिकारी दिलीप पार्लेकर उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: कृषी शिक्षण, संशोधनावरील तरतूद वर्षागणिक तोकडीच

Bharat-VISTAAR AI: अर्थसंकल्पातून 'भारत विस्तार एआय'ची घोषणा, याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Sandlwood Cultivation : चंदन लागवडीसाठी अर्थसंकल्पात तरतूद; पाच राज्यांमध्ये चंदनाची सर्वाधिक लागवड

Groundwater Management: सर्व विभागाच्या समन्वयातून भूजल व्यवस्थापनाची गरज

Union Budget 2026: कृषी, ग्रामीण उद्योगासह शेतकरी हिताचा संकल्प

SCROLL FOR NEXT