कोयना धरणातून विसर्ग agrowon
ॲग्रो विशेष

Koyna Dam : कोयना धरणातून विसर्ग वाढवला, कृष्णा कोयनेच्या पाणी पातळीत घट

Koyna Dam Water : कोयना धरणातून आज (ता.०२) सकाळी ९ वाजता १० हजार क्युसेकने वाढ करत ५० हजार क्यूसेक करण्यात आला आहे.

sandeep Shirguppe

Satara Koyna Dam : सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. जोरदार पावसामुळे धरणक्षेत्रात पाण्याची आवक वाढल्याने २४ तासांत २ टीएमसी पाणी वाढले आहे. आज शुक्रवारी सकाळी आठ वाजता ६८.६३ टीएमसी झाला. सद्यस्थितीत कोयना धरणातून सोडण्यात येत असलेल्या ४० हजार क्यूसेकमध्ये वाढ करून आज (ता.०२) शुक्रवारी सकाळी नऊ वाजता ५० हजार क्यूसेक करण्यात आला आहे.

पायथा वीज ग्रहातून दोन हजार १०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीपात्रात ५२ हजार १०० क्युसेक विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे कृष्णा-कोयना नदीकाठी पुन्हा पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

कोयना पाणलोट क्षेत्रात मागील आठवड्यात पावसाचा जोर कमी झाला होता. त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली होती. त्यामुळे कोयना धरणातून करण्यात येणारा ३० हजार क्युसेक विसर्ग चार दिवस स्थिर ठेवण्यात आला होता. पावसाचा जोर कमी झाल्याने कृष्णा-कोयना नद्यांच्या पाणी पातळीत घट झाल्याने पुराचा धोका टळल्याने मोठा दिलासा मिळाला होता.

दरम्यान कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर मंगळवारी थोडा वाढला. त्यामुळे कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवकही वाढली. धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी मंगळवारी दुपारी बारा वाजता कोयना धरणातून ४० हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला. तो विसर्ग चार दिवस स्थिर ठेवण्यात आला होता. आज शुक्रवारी सकाळी आठ वाजता धरणात ८६.६३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

धरणात ५२ हजार ८३४ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. सध्या धरणातून ४० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून पायथा विजगृहातुन दोन हजार १०० क्युसेक असा ४२ हजार १०० क्युसेक विसर्ग होत आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस चालू असून पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. दरम्यान आज शुक्रवारी सकाळी आठ वाजता कोयनानगरला ९६, नवजाला १३१ व महाबळेश्वर येथे १३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी उद्या शनिवारी व रविवारी अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. या दरम्यान धरणामध्ये येणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा विचार करता धरणामधील विसर्ग वाढविणे आवश्यक होते. त्यामुळे कोयना धरणातील पाण्याच्या विसर्गात वाढ करुन तो आज शुक्रवारी सकाळी नऊ वाजता ५० हजार क्युसेक करण्यात आला आहे.

पायथा वीज ग्रहातून दोन हजार १०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे नदीपात्रात ५२ हजार १०० क्युसेक विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे कृष्णा-कोयना नद्याच्या पाणी पातळीत वाढ होऊन नदीकाठी पुन्हा पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT