Koyna Dam Water agrowon
ॲग्रो विशेष

Koyna Dam : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरण शंभर टक्के भरले, ३० हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग वाढवला

Koyna Dam Full : धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून, जलाशयात येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्याने मंगळवारी रात्री धरणाचा पाणीसाठा १०५.२५ टीएमसी झाला.

sandeep Shirguppe

Koyna Dam Satara : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून, काल रात्री धरण पूर्ण क्षमतेने (१०५.२५) भरले होते. त्यामुळे रात्री एक वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे सव्वा फुटाने उचलून सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात आला.

सकाळी सहा वाजता बंद आणि पुन्हा नऊ वाजता उचलून विसर्ग करण्यात आला. दिवसभरात एक फुटावरून तीन फुटांपर्यंत धरणाचे दरवाजे टप्प्याटप्प्याने उचलण्यात आले असून, सध्या धरणाच्या सांडव्यावरून २८ हजार ३९६ क्युसेक, पायथा वीजगृहातून दोन हजार १०० क्युसेक असा एकूण ३० हजार ४९६ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येत असून, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

३१ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे बंद करून फक्त पायथा वीजगृहातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून, जलाशयात येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्याने मंगळवारी रात्री धरणाचा पाणीसाठा १०५.२५ टीएमसी झाला.

धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरण व्यवस्थापनाने रात्री एक वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे सव्वा फुटाने उचलून कोयना नदीपात्रात तीन हजार ९६९ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात केली. पाच तासांत धरणाचा पाणीसाठा नियंत्रणात आला. त्यामुळे सकाळी सहा वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे धरण व्यवस्थापनाने बंद केले.

पुन्हा पाण्याची आवक वाढली, त्यामुळे सकाळी नऊ वाजता तीन तासांतच धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फुटाने उचलून नऊ हजार ५४६ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात केली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत दरवाजे एक फुटावर होते.

मात्र, पुन्हा पाण्याची आवक वाढली आणि हवामान खात्याने पावसाचा अंदाज व्यक्त केला असल्याने सायंकाळी सहा वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फुटावरून दोन फुटांपर्यंत उचलून १९ हजार ९६ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यास सुरुवात केली. सायंकाळी सात वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे तीन फुटांपर्यंत उचलून सांडव्यावरून २८ हजार ३९६ क्युसेक आणि पायथा वीजगृहातून दोन हजार १०० क्युसेक असा एकूण ३० हजार ४९६ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Sanjay Khatal : ऊस गाळप हंगाम लांबविल्यास नुकसान

Village Story : मातीचे पाय

Wheat Sowing : बागायती गव्हाच्या पेरणीचे नियोजन

Cotton Market : कापूस बाजारात सुधारणेचे संकेत

Weekly Weather : थंडीच्या प्रमाणात हळूवार होईल वाढ

SCROLL FOR NEXT