Kolhapur Agrowon
ॲग्रो विशेष

पंचायतराज पुरस्कारात कोल्हापूर जिल्हा परिषद अव्वल

राहता, मालवण पंचायत समितीसह १७ ग्रामपंचायतींना पुरस्कार

ॲग्रोवन वृत्तसेवा

मुंबई : राष्ट्रीय पंचायतराज दिनाचे (National Panchayat Raj Day) औचित्य साधत केंद्र सरकारने (Government) जाहीर केलेल्या पुरस्कारामध्ये (Panchayat Samiti Award) सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषदेचे मान कोल्हापूर जिल्हा परिषदेने पटकावीत दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कारावर मोहर उमटवली. पंचायत समिती पुरस्कारामध्ये राहता (जि. नगर) आणि मालवण (जि.सिंधुदुर्ग) पंचायत समित्यांची निवड झाल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Rural Development Minister Hasan Mushrif) यांनी पत्रकार परिषदेत दिली.
उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कारात १७ ग्रामपंचायतींचा समावेश झाला आहे. त्याचबरोबर बालसुलभ ग्रामपंचायत पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील श्रृंगारवाडी ग्रामपंचायतीस (ता. आजरा) आणि ग्रामपंचायत विकास आराखडा पुरस्कार नगरच्या लोहगाव ग्रामपंचायतीला मिळाला आहे. तसेच नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार २०२२ हा उस्मानाबाद जिल्ह्यातील भंडारवाडी ग्रामपंचायतीला मिळाला आहे.

दिनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार (Dindayal Upadhyay Panchayat Empowerment Award)अंतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषदेला ५० लाख रुपये तर राहता (जि. नगर) आणि मालवण (जि. सिंधुदुर्ग) या पंचायत समित्यांना प्रत्येकी २५ लाख रुपये आणि १७ ग्रामपंचायतींना लोकसंख्येप्रमाणे ५ ते १५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम पुरस्कार स्वरूपात थेट खात्यात प्राप्त होणार आहे. बालसुलभ ग्राम पंचायत पुरस्कार पटकवलेल्या आजरा तालुक्यातील श्रृंगारवाडी या ग्रामपंचायतीला आणि ग्राम पंचायत विकास आराखडा पुरस्कार मिळालेल्या नगर जिल्ह्याच्या राहता तालुक्यातील लोहगाव या ग्रामपंचायती प्रत्येकी ५ लाख रुपये थेट प्राप्त होतील. त्याचप्रमाणे उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या भंडारवाडी या ग्रामपंचायतीची नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा (Nanaji Deshmukh Rashtriya Gaurav Gram Sabha) पुरस्कारासाठी निवड झाली आहे. या नानाजी देशमुख राष्ट्रीय ग्रामसभा गौरव पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीस १० लाख रुपये रक्कम पुरस्कार स्वरूपात थेट प्राप्त होणार असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.

महिला सरपंचांना १० लाखांचा निधी (10 lakh fund for women sarpanches)
राज्यातील १४ हजार ग्रामपंचायतींचा कारभार सरपंच म्हणून महिला सांभाळत आहेत. कुटुंबाचा सांभाळ करीत गावचा कारभार हाकणाऱ्या महिला सरपंचांना राज्य सरकारकडून दरवर्षी दहा लाखांचे प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे.

१७ ग्रामपंचायतींचाही सन्मान; उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार २०२२ (Honor of 17 Gram Panchayats also; Outstanding Gram Panchayat Award 2022)
मोदाळे (ता.इगतपुरी, जि.नाशिक), लोहगाव (ता.राहता, जि.नगर), लोणी बुद्रूक (ता.राहता, जि.नगर), कोतावडे (ता.कडेगाव, जि.सांगली), वाघोली (ता.मोर्शी, जि.अमरावती), बावी (कौल) (ता.जि.उस्मानाबाद), धारूर (ता.जि.उस्मानाबाद), शिरगाव (ता.कडेगाव, जि.सांगली), दरी (ता.जि.नाशिक), नेरी (ता.मोहाडी, जि.भंडारा), श्रृंगारवाडी (ता.आजरा, जि.कोल्हापूर), नन्व्हा (ता.सालेकसा, जि.गोंदिया), धोरोशी (ता.पाटण, जि.सातारा), झरी (ता.लोहा, जि.नांदेड), आरे (ता.गुहागर, जि.रत्नागिरी), मुठेवडगाव (ता.श्रीरामपूर, जि. नगर), आणि खानापूर (ता.जि.उस्मानाबाद) या ग्रामपंचायतींना उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT