Shaktipeeth Highway agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गाचा रद्दचा आदेश घेऊन कोल्हापुरात या अन्यथा, महिलांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा

CM Eknath Shinde : २२ ऑगस्टला मुख्यमंत्री कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत यावेळी शक्तिपीठ विरोधात महिला जोरदार आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला.

sandeep Shirguppe

Kolhapur Shaktipeeth highway : गोवा ते नागपूर अशा ८०५ किलोमीटर लांबीच्या बारा जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून जोरदार विरोध होत आहे. दरम्यान हा महामार्ग रद्द होण्यासाठी आता शेतकरी महिलाही मैदानात उतरल्या आहेत. दरम्यान २२ ऑगस्टला मुख्यमंत्री कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत यावेळी त्यांनी कोल्हापुरात येताना शक्तिपीठ महामार्ग रद्दचा आदेश घेऊन यावा अन्यथा दुर्गेचा अवतार असलेलं आंदोलनाला सामोरे जावं लागेल असा थेट इशारा आज (ता.२०) पत्रकार परिषदेत कृती समितीच्या महिला प्रमुख अमृता मोरे यांनी दिला.

कृती समितीच्या मोरे पुढे म्हणाल्या की, "लाडकी बहीण" योजनेचे दीड हजार रुपये अनुदान देत असल्याचे मुख्यमंत्री सांगत आहेत तेच खरे म्हणजे "लाडका कंत्राटदार" या योजनेअंतर्गत जनतेकडूनच कोट्यावधी रुपये काढून घेणार आहे. याचा विपरीत परिणाम शेतकऱ्यांच्या कुटुंबातील महिला व लहान मुलांवर होणार आहे. कोल्हापुरातील शेतकऱ्यांच्यावर अन्याय करताना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे विसरले आहेत की कोल्हापूर जिल्हा हा जसा राजर्षी शाहू महाराजांचा आहे तसाच तो रणरागिणी ताराराणीचा आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील ताराराणीच्या वारसदार रणरागिणी आपल्यावरचा अन्याय अजिबात सहन करणार नाहीत. २२ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या दौऱ्यात हे ताराराणीच्या रणरागिणींचे रौद्ररूप पाहायला मिळेल अशी माहिती अमृता मोरे यांनी दिली.

शासनाची लाडकी बहीण ही योजना निव्वळ मतं मिळवण्याचा स्टंट आहे असे वाटू लागले आहे. स्वतःला भाऊ म्हणून घेणारे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे बहिणींच्या संसारात विष कालवण्याचे काम करत आहेत. बहिणींच्या कडून शेती काढून घेऊन त्यांचे संसार उध्वस्त करणाऱ्याला भाऊ कसे म्हणायचे?

२२ ऑगस्ट २०२४ रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे लाडकी बहीण योजना प्रचार करण्यासाठी व मते मागण्यासाठी येत आहेत. आम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व महिलांना आवाहन करायचे आहे की हजारो शेतकरी महिला व शेतमजूर महिला यांचे संसार उध्वस्त करणारे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकावा. शेतकऱ्यांची जर जमिनी काढून घेतल्या तर त्यांच्यासमोर आत्महत्या करण्याशिवाय काही पर्याय उरणार नाही. महाराष्ट्रातील असंख्य महिलांना विधवा करणारे हे महाराष्ट्र सरकारमधील नेते भाऊ नसून हे यमराज आहेत असे म्हणावे लागेल.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना खरोखरच बहीण भावाचे नाते समजत असेल तर त्यांनी बहिणींना ओवाळणी म्हणून शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचा आदेश भेट म्हणून द्यावा. अन्यथा २२ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांचे स्वागत शेतकरी बहिणी हे दुर्गेचे रूप घेऊन आंदोलनाने करतील.

अमृता मोरे, स्वाती क्षीरसागर, सविता पाटील, सुभद्रा मानकापुरे, संगीता मगदूम, शुभांगी मगदूम, मनीषा मुगडे, तिथी कांबळे, रोहिणी शिंदे, धनश्री पुजारी, पुनम पोवार या शेतकरी महिला उपस्थित होत्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Watermelon Harvesting: गोड, दर्जेदार कलिंगडांसाठी उन्हाळ्यात काळजी आणि योग्य वेळी काढणी गरजेची

Agri Administration Discussion: नव्या गुणनियंत्रण संचालकाची चर्चा

Ujani Dam Water Release: उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडले

Lemon Rate: अमरावतीत लिंबाला ६००० ते ७००० रुपये दर

Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधी यांची भिवंडी न्यायालयात हजेरी

SCROLL FOR NEXT