Kolhapur Sugar Factory agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Sugar Factory : कोल्हापूरमध्ये गाळपात वारणा साखर कारखान्याची बाजी, जिल्ह्याचे ३९ लाख टन गाळप पूर्ण

Kolhapur Sugarcane Production : कोल्हापूर जिल्ह्यात साखर कारखाने उशिरा सुरू होऊन गाळपात मात्र आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.

sandeep Shirguppe

Sugar Production Kolhapur : राज्यात १ नोव्हेंबरपासून साखर कारखाने सुरू झाले परंतु कोल्हापूर जिल्ह्यात ऊस दराच्या संघर्षामुळे तब्बल महिनाभर साखर कारखाने उशिरा सुरू झाले. दरम्यान राज्यात कोल्हापूर जिल्ह्यात साखर कारखाने उशिरा सुरू होऊन गाळपात मात्र आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. अवघ्या महिनाभरात साखर कारखान्यांनी ३८ लाख ८१ हजार ५९ मे. टन ऊसाचे गाळप करुन ३८ लाख ३९ हजार १६० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झालेले आहे.

कोल्हापूर जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा ११.०४ आहे. तर सर्वाधिक गाळप करण्यात वारणानगरच्या तात्यासाहेब कोरे सहकारी साखर कारखान्याने आघाडी घेतली आहे. तर यापाठोपाठ शाहू सहकारी साखर कारखाना आणि जवाहर सहकारी साखर कारखाना गाळपात आघाडीवर आहे. यंदा शेतकरी संघटनांच्या आंदोलनामुळे साखर कारखाने सुरू होण्यास तीन आठवड्यांचा उशीर झाला असला तरी साखर कारखान्यांनी गाळप हंगामात जोर धरला आहे.

२२ कारखाने सुरू

जिल्ह्यातील २२ साखर कारखाने सुरू झाले असून त्यात १५ सहकारी व ७ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. सहकारी साखर कारखान्यांनी २७ लाख ७५ हजार ५४३ टन तर खासगी कारखान्यांनी ११ लाख ५ हजार ५१६ टनाचे गाळप केले आहे.

जिल्ह्यातील कारखान्याचे एकूण गाळप

तात्यासाहेब कोरे वारणा - ३,७६,५००, छत्रपती शाहू कागल - ३,०६,४०५, जवाहर हपरी - ३,०५,०००, दत्त शिरोळ - २,६६,१९०, सरसेनापती संताजी घोरपडे बेलेवाडी - २,४८,७७५, दालमिया आसुर्ले पोर्ले - २,४८,४९०, ओलम अॅग्रो इंडिया राजगोळी खुर्द २,१४,७९२, दूधगंगा बिद्री - २.१३,९२४, डी. वाय. पाटील असळज - २,०७,२३०, कुंभी कासारी कुड़ित्रे - १,५५,४८०, उदयसिंगराव गायकवाड बांबवडे - १,३७,६१९.

सदाशिवराव मंडलिक कागल - १,३६,५२०, गुरुदत्त शुगर्स टाकळीवाडी - १,२७,८७०, दौलत हलकर्णी- १,२६,८९०, पंचगंगा रेणुका शुगर्स - १,२६,८००, छत्रपती राजाराम कसबा बावडा - १,१९,४५०, इको केन एनर्जी म्हाळुंगे - १,१६,७२५, भोगावती परिते - १,०८,२६०, अथणी शुगर तांबाळे - १,०६,२२६, शरद नरंदे - १,०५,०७५, आजरा गवसे - ८४,२००, रिलाएबल शुगर फराळे - ४२,६३८.

पुणे विभाग गाळपात आघाडीवर

सध्या पुणे विभाग आघाडीवर गाळप करत आहे. २९ साखर कारखान्यांनी ७५.३९ लाख टन उसाचे गाळप करून ६६.५७ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. सरासरी उतारा ८.८३ इतका आहे. यानंतर सोलापूर विभागाने दुसऱ्या स्थानावर राहत ७२.६६ लाख टन ऊस गाळप केले आहे. ९३ सरासरी उताऱ्यासह सोलापूर विभागात ५७.६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

तर कोल्हापूर विभागात ३७ साखर कारखान्यांनी ६८.१९ लाख टन उसाचे गाळप केले आहे तर ६६.७३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केल्याची माहिती समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्याची रिकव्हरी ९.७९ सरासरी उताऱ्यासह राज्यात आघाडीवर आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT