Shetkari Sangh Agrowon
ॲग्रो विशेष

Shetkari Sangh : शेतकरी संघातील जास्त पगारावर घेतलेल्या कर्मचाऱ्यांची अखेर नियुक्ती रद्द

Shetkari Sahkari Sangh : शेतकरी सहकारी संघाच्या भवानी मंडप येथील मुख्य कार्यालयात संचालक मंडळाची बैठक झाली.

sandeep Shirguppe

Kolhapur Shetkari Sangh : शेतकरी सहकारी संघात नियुक्त केलेल्या दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती अखेर रद्द करण्यात आली, तर ग्राहकांना शेतकरी संघाची दर्जेदार आणि नामांकित मिरची पूड देण्यासाठी चांगल्या दर्जाचीच मिरची खरेदी करण्याचा निर्णय आज झालेल्या संचालकांच्या बैठकीत घेण्यात आला.

शेतकरी सहकारी संघाच्या भवानी मंडप येथील मुख्य कार्यालयात संचालक मंडळाची बैठक झाली. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष प्रवीणसिंह पाटील होते. दरम्यान, 'सकाळ'ने संघातील अतिरिक्त नोकरभरती आणि मिरची खरेदीतील नियोजनशून्यता उजेडात आणल्यानंतर या निर्णयावर आज सविस्तर चर्चा झाली.

शेतकरी संघात पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना कमी आणि नवीन दोन कर्मचाऱ्यांना जास्त पगारावर घेतले होते. त्यामुळे संघाच्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सुरू होता. नवीन कर्मचाऱ्यांना जेवढा पगार दिला तेवढाच पगार आम्हालाही मिळाला पाहिजे, अशी कर्मचाऱ्यांनी भूमिका घेतली होती. हे कर्मचारी कोणाच्या निर्णयाने भरले याबाबत आजच्या सभेत चर्चा होणार होती.

तत्पूर्वीच अध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांनी त्यांची नियुक्ती रद्द केली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमधील रोष मावळला आहे. तसेच खत निर्मिती आणि मिरची पूड हे संघाचे मुख्य उत्पादन झाले आहे.

यामध्ये संघाच्या ब्रँडला शोभेल अशी पूर्वीप्रमाणे चांगल्या दर्जाची मिरची पूड देण्यासाठी चांगल्या दर्जाचीच मिरची खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मिरची खरेदीसाठी उद्यापासून काही संचालक जाणार आहेत. ज्या ठिकाणी पूर्वी मिरची घेतली जात होती, त्याच ठिकाणाहून मिरची खरेदी केल्यास फायद्याचे होईल, असे काही संचालकांनी सुचवले आहे.

यावेळी उपाध्यक्ष राजसिंह शेळके, अजितसिंह मोहिते, अमरसिंह माने, जी. डी. पाटील, राजू पाटील- टाकवडेकर, सर्जेराव देसाई, सुनील मोदी, प्रधान पाटील आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT