Shetkari Sangh Kolhapur : शेतकरी संघात मिरची प्रकरण तापणार, जुने बाजूले ठेवून जास्त पगाराने दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती

Shetkari Sangh Chairman : शेतकरी संघात मिरची खरेदी प्रकरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.
Shetkari Sangh Kolhapur
Shetkari Sangh Kolhapuragrowon

Kolhapur Shetkari Sangh : घाईला आलेल्या शेतकरी संघाच्या निवडणुकीवेळी सर्वपक्षीय नेत्यांनी उर्जितावस्था देऊ म्हणत शेतकरी संघ ताब्यात घेतला. परंतु अवघ्या सहा महिन्यात संघाला आणखी खोलात नेण्याचे काम या नेत्यांनी केल्याचे समोर आले आहे.

शेतकरी संघात मिरची खरेदी प्रकरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे. संघाच्या कारभाऱ्यांनी इतर कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त पगार देऊन दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या कामगारांनी मात्र मिरची खरेदीत चालढकल केली जात आहे.

खत उत्पादन आणि मिरची पूड हेच संघाच्या उत्पन्नाचे बलस्थान आहे. संघाच्या दर्जेदार मिरची पुडीला चांगली मागणी आहे. यासाठी चांगल्या दर्जाची मिरची वापरली जाते. चांगल्या रंगाची आणि चवीची मिरची वापरूनच ही पूड तयारी केली जाते. सध्या, संघात मिरची खरेदीवरुनच घमासान आहे.

पूर्वी खरेदी केलेल्या मिरचीपेक्षा दुसऱ्या किंवा त्याच जातीतील कमी किमतीतील मिरची घेऊन तयार केलेल्या मिरची पुडीला ग्राहकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. पूर्वी एका फोनवरुन खरेदी केली जाणारी मिरची आता सर्व संचालक मंडळ खरेदीसाठी जात आहेत. तरीही मिरची खरेदीचे त्रांगडे सुटेना झाले आहे. कऱ्हाडमधील एका मोठ्या हॉटेलसह इतर ठिकाणाहून टनाने मिरची पुडीची मागणी आहे.

Shetkari Sangh Kolhapur
Stormy Rain in Kolhapur : कोल्हापुरला सलग दुसऱ्या दिवशी वळवाचा तडाखा; पिकांचे नुकसान, घरांची पडझड

प्रत्यक्षात पूर्वपेक्षा कमी प्रतिची मिरची पूड दिल्याने मिरची पूर परत दिल्याची माहिती आहे. संघात पंधरा वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपेक्षा नवीन दोन कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. त्यामुळे जुन्या कर्मचाऱ्यांमधून याचा संताप व्यक्त केला जात आहे.

कमी पगारवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त पगार देवून कर्मचारी घेतल्याबद्दल कर्मचारी संघटनाही नाराज असल्याची माहिती आहे. शेतकरी संघाचे एका संचालकाने मार्केट यार्ड येथे काही संचालकांची बैठक घेवून पदाधिकाऱ्यांच्या कामाबद्दल नाराजी दर्शवल्याची चर्चा आहे. त्यामुळे गटबाजी केली जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मिरची खरेदीचे अधिकार संघाच्या उपाध्यक्षांना दिले आहेत. त्यामुळे मिरची खरेदी आणि मिरची पूड विक्रीबाबत तेच उत्तर देऊ शकतात. तसेच, सध्या दोन कर्मचाऱ्यांची तत्काळ गरज होती. त्यामुळे हे कर्मचारी घेतले आहेत. गरज असल्यामुळेच कर्मचारी घेतले असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांनी माहिती दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com