Electricity Bill Recovery Agrowon
ॲग्रो विशेष

Electricity Bill Dues : कोल्हापूर परिमंडळात तब्बल ३४ कोटींची वीजबिल थकबाकी

Power Supply Disconnect : गेल्या तीन महिन्यांत परिमंडळाअंतर्गत ३ हजार ५३७ ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरुपात खंडित करण्यात आला आहे.

Team Agrowon

Sangli / Kolhapur News : वीजबिलाचा भरणा होत नसल्याने कोल्हापूर परिमंडळाअंतर्गत प्रामुख्याने घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा व इतर वर्गवारीतील ७१ हजार २८१ ग्राहकांकडे ३४ कोटी ५९ लाख रुपयांची थकबाकी झाली आहे.

गेल्या तीन महिन्यांत परिमंडळाअंतर्गत ३ हजार ५३७ ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरुपात खंडित करण्यात आला आहे. थकबाकीदार वीजग्राहकांनी बिलांचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

कोल्हापूर परिमंडळाअंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील घरगुती ५४ हजार २९२ ग्राहकांकडे ६ कोटी ६७ लाख, व्यावसायिक ६ हजार ४०६ ग्राहकांकडे २ कोटी ४७ लाख, औद्योगिक ७ हजार १९४ ग्राहकांकडे २२ कोटी १९ लाख, सार्वजनिक सेवा २ हजार ९९२ ग्राहकांकडे २ कोटी ५८ लाख आणि इतर वर्गवारीतील ३९७ ग्राहकांकडे ६८ लाख रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे.

सांगली जिल्ह्यातील सांगली शहर विभागात १० हजार १३३ ग्राहकांकडे ०३ कोटी ६१ लाख, सांगली ग्रामीण विभागात ६ हजार ५१५ ग्राहकांकडे ०१ कोटी ४२ लाख, इस्लामपूर विभागात १० हजार ७८६ ग्राहकांकडे ०५ कोटी ०१ लाख, कवठेमहांकाळ विभागात ८ हजार ९७० ग्राहकांकडे ०२ कोटी १६ लाख व विटा विभागात ९ हजार ६२१ ग्राहकांकडे ०२ कोटी ७२ लाख रुपयांची थकबाकी आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर शहर विभागात एकूण ३ हजार ६४१ ग्राहकांकडे ०१ कोटी ७१ लाख, कोल्हापूर ग्रामीण-१ विभागात ३ हजार ७७० ग्राहकांकडे ७० लाख, कोल्हापूर ग्रामीण-२ विभागात ४ हजार ८० ग्राहकांकडे ०८ कोटी ७१ लाख, जयसिंगपूर विभागात ४ हजार ४४५ ग्राहकांकडे ०१ कोटी ८८ लाख, इचलकरंजी विभागात ०७ हजार ७९७ ग्राहकांकडे ०६ कोटी ०९ लाख व गडहिंग्लज विभागात १ हजार ५२३ ग्राहकांकडे ५७ लाख रुपयांची थकबाकी आहे.

थकित बिलांचा लवकर करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (ता. २९), रविवारी (ता. ३०) व सोमवार (ता. ३१) सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Fragmentation Act: शहरी भागात तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची महसूल मंत्री बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा

QR Code For fertilizer: ‘क्यूआर कोड’वरून कळणार उपलब्ध खते

Bridge For Ghanegar: साकवावरून जीवघेणा प्रवास

Dahanu Floods: डहाणूमध्ये सूर्या नदीला पूर; सतर्कतेचा इशारा

Tree Plantation: दहा हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

SCROLL FOR NEXT