Electricity Bill Payment: निलंगा विभागातील २२ गावे वीजबिलमुक्त; ३४ लाखांची थकबाकी पूर्ण वसूल!

Mahavitaran Bill Collection: लातूर जिल्ह्यातील निलंगा विभागाने वीजबिल वसुलीत नवा आदर्श निर्माण केला आहे. या विभागातील २२ गावांनी आपली थकबाकी आणि चालू बिल १००% भरून वीजबिलमुक्ती साधली आहे.
Nilanga Electricity Bill Department
Nilanga Electricity Bill DepartmentAgrowon
Published on
Updated on

Latur News: महावितरणची मार्च अखेरची मागणी व थकबाकी वसुलीसाठी सर्व अधिकारी कर्मचारी भर उन्हात फिरत आहेत. यात निलंगा विभागांतर्गत येणाऱ्या बावीस गावांतील सर्व ग्राहकांनी त्यांच्याकडील वीजबिलांची चालू व थकीत बिलाचा शंभर टक्के भरणा करत वीजबीलमुक्ती साधली आहे.

यातून गावांनी नवा पायंडा निर्माण केला आहे. निलंगा-२, कासार शिरसी, औसा दक्षिण, किल्लारी- एक व दोन, लामजना एक व दोन, आंबुलगा तसेच शिरूर अनंतपाळ शाखा कार्यालयांनी पथदर्शक पाऊल उचलत मुदतीच्या आत चालू महिन्याचे वीजबिल व थकबाकी शंभर टक्के वसूल करण्यात यश मिळवले आहे.

या यशाचे मानकरी असलेले सर्व तंत्रज्ञ, जनमित्र, लेखाधिकारी, मानव संसाधन विभागाचे कर्मचारी तसेच सर्व अभियंते यांचा मुख्य अभियंता अरविंद बुलबुले, अधीक्षक अभियंता मदन सांगळे तसेच कार्यकारी अभियंता संजय पोवार यांनी अभिनंदन केले असून केला असून प्रत्येक जनमित्रांनी असा आदर्श समोर ठेवून मार्च अखेर संपूर्ण विभाग थकबाकीमुक्त करावा असे आवाहन केले.

Nilanga Electricity Bill Department
Electricity Bill Dues : वीजबिल न भरल्याने अहिल्यानगरच्या हजारो घरांचा वीजपुरवठा खंडित

मार्चअखेर चालू देयक व थकबाकी वसुलीसाठी महावितरणने कंबर कसली असून विविध उपाययोजना करून सांघिक कार्यालयाने दिलेले वसुलीचे उदिष्ट पूर्णत्वास नेण्यासाठी उन्हाची पर्वा न करता दिवसभर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जनमित्र काम करत आहेत. या वसुली अभियानामध्ये निलंगा विभागातील शाखा कार्यालयांनी एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

निलंगा विभागाअंतर्गत येणाऱ्या २२ गावांकडे असलेली थकबाकी व चालू महिन्याचे देयक असे एकत्रित ३४ लाख ३१ हजार रुपयांची थकबाकी जमा करत थकबाकी शुन्य केल्याचा बहुमान मिळाला आहे. घरगुती व व्यावसायिक वर्गवारीतील ३१८९ वीजग्राहकांकडील चालू देयकासह थकीत ३४ लाख ३१ हजार रुपयांची वसुली करण्यात यश प्राप्त केले आहे.

Nilanga Electricity Bill Department
Electricity Bill Recovery : धाराशिवच्या वीजग्राहकांनी भरली १४ कोटींची थकबाकी

...ही आहेत बावीस गावे

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील दगडवाडी, हणमंतवाडी, सावरगाव तसेच औसा तालुक्यातील कुमठा, बाणेगाव, वाघोली, येळी, जावळी, देवांग्रा, मुगळेवाडी, अपचुंदा, गाढवेवाडी, हत्तरगा तर निलंगा तालुक्यातील सिगनाळ, चांदोरी, पिंपळवाडी, मालेगाव जेवरी, सांगवी, हणमंतवाडी, बोळेगाव, वाकसा, व चिंचोली(भ) या गावातील वीजग्राहकांनी आपले बिल आपली जबाबदारी समजून वीजबिल कोरे केले आहे.

वीजग्राहकांना दिलेली वीजसेवा व वेळेच्या आत केलेले तक्रारींचे निरसन यामुळेच थकबाकी वसुली शक्य झाल्याचा मनोदय थकबाकी शून्य केलेल्या गावातील जनमित्रांनी व्यक्त केला. वीजग्राहकांशी सुसंवाद ठेवला तर काहीही अशक्य नाही असे विचार कार्यकारी अभियंता संजय पोवार यांनी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत व्यक्त केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com