Kolhapur market committee agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Market Committee : तोलाईदारांच्या वेतनाचा पेच कायम, बाजार समिती अन् अडत्यांनी दाखवले एकमेकांकडे बोट

Kolhapur Bajar Samiti : शेती उत्पन्न बाजार समितीच्या मान्यतेने २३ तोलाईदारांची भरती झाली. त्या तोलाईदारांना वेतन व काम देण्यावरून पेच निर्माण झाला आहे.

sandeep Shirguppe

Market Yard Kolhapur : शेती उत्पन्न बाजार समितीच्या मान्यतेने २३ तोलाईदारांची भरती झाली. त्या तोलाईदारांना वेतन व काम देण्यावरून पेच निर्माण झाला आहे. बाजार समिती, माथाडी असंरक्षित कामगार बोर्ड व अडते असे घटक एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. यातून आज चौथ्या दिवशीही तोलाईदारांच्या वेतनाचा पेच कायम राहिला आहे.

शेती उत्पन्न बाजार समितीच्या शाहू मार्केट यार्डात नोंदणीकृत अडत्यांकडे येणाऱ्या शेतीमालाचे वजन करण्यासाठी तोलाईदाराची नियुक्ती करण्यात येते. त्यानुसार १०८ तोलाईदार मार्केट यार्डात पूर्वीपासून कामावर आहेत. त्यांच्या नियुक्त्या कायम असताना आठ महिन्यांपूर्वी बाजार समितीच्या संमतीने आणखी २३ तोलाईदारांची नवीन अतिरिक्त भरती करण्यात आली.

भरतीला माथाडी बोर्डने मान्यता दिली. नव्याने भरती झालेले तोलाईदार कामावर येऊ लागले, पण अडत्याकडे पूर्वीचे तोलाईदार कामावर आहेत, जास्त काम नाही. त्यामुळे नवीन तोलाईदारांना काम व वेतन (मजुरी) देणे अशक्य असल्याचा मुद्दा अडत्यांनी उपस्थित केला. यातून तोलाईदारांना वेतन मिळालेले नाही.

यातून वाद सुरू झाले. हा वाद माथाडी व असंरक्षीत कामगार बोर्डाकडे गेला. तोलाईदाराची भरती बेकायदेशीर असल्याचे अडत्यांचे म्हणणे मांडले. तर आमची नियुक्ती केल्याने आम्हाला काम द्या व वेतन द्या असे नवे तोलाईदार म्हणत आहेत. माथाडी बोर्डाचे निरीक्षक किशोर खैरे यांनी तोलाईदारांना परवाने बाजार समितीने निश्चित केले. त्यामुळे मान्यता दिली, बाजार समितीकडेच दाद मागावी, असे सांगितले. बाजार समितीने अखेर अडत्यांनी तालाईदारांना वेतन द्यावे, असे आदेश काढले. मात्र चौथ्या दिवशीही तोलाईदारांचे वेतन मिळालेले नाही.

तोलाईदारांच्या नियुक्तीवरून संचालक मंडळातही धुसफूस आहे. काही संचालक अतिरिक्त तोलाईदार भरती करू नका, असे सांगत आहेत तर मोजकेच तोलाईदार भरले आहेत. त्यांची अडत्यांना कामासाठी मदत होईल. त्यामुळे तोलाईदारांची भरती गरजेचीच आहे, असे सांगत आहेत. यावर बाजार समिती प्रशासनाने माथाडी असंरक्षित मंडळाने वेतन द्यावे, असे पत्र आज दिले आहे. मात्र प्रत्यक्ष तोलाईदारांना वेतन मिळालेले नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : कोकणातील शेतकऱ्यांना लवकरच मिळणार नुकसान मदत आणि भरपाई; कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत ग्वाही

Organic Farming Story: आघातांनीच दाखविला आरोग्यदायी शेतीचा मार्ग

India Biofortified Crops: जैवसंपोषण : आर्थिक विकासाची किल्ली

Pulses Procurement Challenges: थेट खरेदीच्या वल्गना

Water Lifting Ban: कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात उद्यापर्यंत उपसाबंदी शिथिल

SCROLL FOR NEXT