Kolhapur Patgaon Dam agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Patgaon Dam : गौतम अदानींचे मनसुबे कोल्हापूरकरांनी उधळले, पाटगाव धरणातील पाणी देण्यास स्थगिती

Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू होणाऱ्या उद्योगपती गौतम अदानींच्या कंपनीच्या हायड्रो इलेक्ट्रिक वीज निर्मिती प्रकल्पाचे काम सुरू आहे.

sandeep Shirguppe

Adani Group Patgaon Dam Kolhapur : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू होणाऱ्या उद्योगपती गौतम अदानींच्या कंपनीच्या हायड्रो इलेक्ट्रिक वीज निर्मिती प्रकल्पाचे काम सुरू आहे. दरम्यान या प्रकल्पाला कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यामध्ये असणाऱ्या पाटगाव धरणातील पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले होते.

यावर भुदरगड तालुक्यातील अनेक गावांनी विरोध केला. याचबरोबर आमदार प्रकाश आबिटकर यांनीही या प्रकल्पाला विरोध केला होता. परंतु वन विभागाकडून या प्रकल्पास तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती दिली आहे.

मागच्या ८ दिवसांपासून पाटगाव धरणातील शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी अदानी उद्योग समूहाच्या वीज निर्मिती प्रकल्पाला देऊ नये, अशी मागणी करत पाटगाव धरण पाणी बचाव कृती समितीच्यावतीने गारगोटी येथील तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन केले होते.

भूदरगड तालुक्यातील पाटगांव मध्यम प्रकल्पाचे पाणी कोकणामध्ये वळवून वीज निर्मिती करण्याचे प्रकल्पास तालूक्यातील सर्व नागरीकांचा तिव्र विरोध आहे. यामध्ये लोकभावना प्रचंड तिव्र असलेने सदर प्रकल्प इतरत्र उभारणी करावी व सदर प्रकल्पास दिलेली संयूक्त सर्वेक्षणाची परवानगी रद्द करावी असे या कार्यालयास कळविण्यात आले होते.

दरम्यान या प्रकल्पास दिलेली परवानगी तात्पुरत्या स्वरूपात स्थगीत करण्यात येत आहे. त्यामूळे जागेवर असलेले साहीत्य सामुग्री तात्काळ हलविण्यात यावी तसेच सदर जागेवर कोणतेही काम होणार नाही याची दक्षता घ्यावी. असे पत्र कोल्हापूर वनविभागाचे उपवनसंरक्षक जी गुरुप्रसाद यांनी सादर केले आहे.

राधानगरी भुदरगडचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असून अदानी ग्रुपच्या वतीने पाटगाव धरणातील पाणी घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, भुदरगड तालुक्यासाठी पाटगाव धरण हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी अनेक लोकांचे योगदान मिळाले आहे.

भुदरगड तालुका समृद्ध करण्यासाठी पाटगाव धरणाचा मोठा वाटा आहे. यामुळे या धरणातील पाण्याचा एकही थेंब अदानी किंवा अन्य कोणीही मागितलं तरी न देणं हे आपलं कर्तव्य आहे.

सध्या धरणामध्ये पाणीसाठा हा कमी असल्याने आम्ही पाणी देऊ शकत नाही असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून धरणातील एक थेंब हे पाणी देणार नाही. यामुळे या धरणातील एक थेंब हे पाणी या प्रकल्पाला देणार नाही. या पाण्यावर अधिकार हा फक्त भुदरगड तालुक्यातील शेतकऱ्यांचा आहे. यामुळे अशा कोणत्याही प्रकारची परवानगी मी आमदार म्हणून मिळू देणार नाही असे आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Result 2024 : छत्रपती संभाजीनगर, बीड, जालन्यात महायुतीच सरस

Solapur Assembly Election Result : सोलापूर जिल्ह्यात भाजपची सरशी

Maharashtra Vidhansabha Election Result : परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात महायुतीला घवघवीत यश

BJP Dominance : महाराष्ट्रावरील भाजपची मांड पक्की

Vidhansabha Election Result 2024 : लातूर,धाराशिवकरांची महायुतीला पसंती

SCROLL FOR NEXT