Bamboo Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Bamboo Cultivation : बांबू लागवडीतून पर्यावरण रक्षणाचे काम करावे

Bamboo Farming : जिल्ह्यात बाबू लागवडीला मोठा वाव आहे. नैसर्गिकदृष्ट्या बांबू लागवडीसाठी जिल्ह्यातील जमीन पोषक आहे. शासनाच्या बांबू लागवडीसाठी वेगवेगळ्या अनुदानित योजनाही आहेत.

Team Agrowon

Kolhapur News : बांबू लागवडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी अर्थाजनाबरोबरच पर्यावरण रक्षणाचे काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कणेरी (ता. करवीर) येथे केले. कृषी विभाग, ‘आत्मा’, कृषी विज्ञान केंद्र कणेरीमठ व बांबू सोसायटी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (ता. २८) आयोजित बांबूविषयक कार्यशाळेच्या उद्‍घाटन प्रसंगी येडगे बोलत होते. कणेरी मठाचे मठाधीपती श्री काडसिद्धेश्वर महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. येडगे म्हणाले, की जिल्ह्यात बाबू लागवडीला मोठा वाव आहे. नैसर्गिकदृष्ट्या बांबू लागवडीसाठी जिल्ह्यातील जमीन पोषक आहे. शासनाच्या बांबू लागवडीसाठी वेगवेगळ्या अनुदानित योजनाही आहेत.

या कार्यशाळेच्या माध्यमातून बांबू लागवड वाढावी अशी अपेक्षा आहे. श्री काडसिद्धेश्वर महाराज म्हणाले, की जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बांबू लागवडीचा क्रांतिकारक निर्णय घेऊन शेतीला एक वेगळी दिशा द्यावी. शेतकऱ्यांनी बांबू लागवडीसाठी एकत्रित प्रयत्न करावेत. यातून सर्वांनाच फायदा होऊ शकेल.

शेतकऱ्यांना बांबू लागवड व्यवस्थापन, प्रक्रिया व विक्री व्यवस्था याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नॅशनल एन्व्हायर्नमेंटल इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, नागपूर येथील प्रमुख शास्त्रज्ञ व बांबू लागवड तज्ज्ञ डॉ. लालसिंग यांनी ‘बांबू लागवड तंत्रज्ञान’ या विषयावर मार्गदर्शन केले. बांबू तज्ज्ञ अरुण वांद्रे, डॉ. प्रदीप तातेड (माजलगाव जि. बीड) व विनोद पाटील (खामदळे, ता. चंदगड) यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

या वेळी बांबू लागवड प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. बांबू रोपे तसेच बांबूपासून तयार केलेल्या वस्तू तसेच खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले. कोल्हापूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, प्रकल्प संचालक रक्षा शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी पोपट पाटील, उप विभागीय कृषी अधिकारी किरण पाटील, कणेरी कृषी विज्ञान केंद्र प्रमुख रवींद्र सिंग आदी उपस्थित होते. ‘आत्मा’चे तालुका कृषी व्यवस्थापक पराग परीट यांनी सूत्रसंचालन केले. उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे यांनी प्रास्ताविक केले. करवीरचे तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT