Kolhapur Jaggery Deal Agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Jaggery Deal : दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर गुळाला मिळाला साडेपाच हजार उच्चांकी दर

Jaggery Price In Kolhapur APCM : कोल्हापुरच्या श्री शाहू मार्केट यार्डात जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांच्या हस्ते गूळ सौदा काढण्यात आले.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : बलिप्रतिपदा दीपावली पाडव्यानिमित्त (ता.२) कोल्हापुरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गूळ सौदा सकाळी साडेनऊ वाजता काढण्यात आला. कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांच्या हस्ते आणि समितीचे सचिव जयवंत पाटील यांच्या उपस्थितीत सौदा काढण्यात आला. यावेळी यंदाच्या हंगामातील गुळाला ५ हजार ६०१ रुपयांचा उच्चा दर मिळाला. यावेळी शेतकरी सेवा अडत दुकानात समितीचे सचिव जयवंत पाटील यांच्यासह शेतकरी, अडते, व्यापारी, हमाल-तोलाईदारांसह बाजार समितीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान १५ नोव्हेंबरनंतर साखर कारखाने सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाने दिल्याने यंदाचा साखर हंगाम लांबला. यामुळे गुऱ्हाळांचे धुराडे लवकर पेटले असून बाजार समितीत गुळाची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. या हंगामात आतापर्यंत ७ लाख २२ हजार ४६६ रव्यांची आवक झाली असून, गेल्या हंगामापेक्षा २९ हजार ५९३ गूळ रव्यांची आवक झाली. गेल्या हंगामात १ एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ पर्यंत ६ लाख ९२ हजार ८७३ गूळ रव्यांची आवक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झाली होती.

याचबरोबर बाजार समितीत कांद्याचीही आवक वाढली असून चांगल्या प्रतीच्या कांद्याला प्रतिक्विंटल ५२०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. बाजार समितीत दररोज १० ते ११ हजार पिशव्यांची आवक होत आहे. एकदम हलक्या कांद्याला प्रतिक्विंटल १५००, तर चांगल्या प्रतीच्या कांद्याला ५ हजारापेक्षा अधिक दर मिळत आहे.

बावडा परिसरात म्हशींच्या सौंदर्य स्पर्धा

एकीकडे दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर बाजार समितीत गुळाचा सौदा होत असतानाच दुसरीकडे येथील बावडा परिसरात म्हशी पळवणे आणि सौंदर्य स्पर्धा आयोजित केली होती. यानिमित्ताने येथे अनेक पशुपालक शेतकरी सहभागी झाले. पशुधन हे शेतकऱ्यांच्या आयुष्यातलं महत्त्वाचं धन मानलं जातं. पाडवा निमित्त बळीराजा या पशुधनाची पूजा करतो, सजवतो आणि त्यानंतर चौकात येऊन या स्पर्धेत सहभागी होतो.

तर या स्पर्धेचे प्रमुखे आकर्षन हे टू व्हीलरच्या आवाजाने म्हशी पळवणे आहे. म्हशीचा मालक टू व्हीलरवर बसलेला असतो आणि म्हस गाडीच्या आणि मालकाच्या आवाजामागे धावत असते. याच स्पर्धेत म्हसीच्या दोन्ही शिंगांना आकर्षक मोरपिसं आणि मोठे तुरे लावण्यात येतात. तसेच म्हशींच्या पाठीवर वेगवेगळे संदेश लिहिण्यात येतात. या स्पर्धेचे उद्घाटन काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

Ginger Research Center: आले संशोधन केंद्राचा पेच; कृषिमंत्र्यांच विधानपरिषदेत बैठकीचं आश्वासन 

Silk Market : बीड रेशीम कोष बाजारात शेतकऱ्यांचे शोषण

Turmeric Market : नांदेडला हळदीचे चुकारे थकल्याने लिलाव पाडले बंद

Agriculture Mechanization : टिलरने वाढले शेतकऱ्यांचे बळ

Agrowon Podcast: तुरीचा बाजार मंदीतच; हळदीला मर्यादीत उठाव, कांदा स्थिर, गवार तेजीत, तर कोबीची आवक कायम!

SCROLL FOR NEXT