Sugar Production kolhapur agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Production : कोल्हापूर जिल्ह्याचा साखर उत्पादनात डंका, शेतकऱ्यांना हंगाम लांबणीचा मात्र फटका

Kolhapur Sugar Production : कोल्हापूर जिल्ह्यात गाळप कमी झाले असले तरी साखरेचा उतारा पडत असल्याने उत्पादनात साखर कारखान्यांनी मोठी मजल मारली आहे.

sandeep Shirguppe

Sugar Production Kolhapur : उशिरा सुरू झालेला कोल्हापूर जिल्ह्यातील गाळप हंगाम मध्यावर येऊन पोहोचला आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात गाळप कमी झाले असले तरी साखरेचा उतारा पडत असल्याने उत्पादनात साखर कारखान्यांनी मोठी मजल मारली आहे. दरम्यान लांबलेल्या हंगामाचा शेतकऱ्यांना काही अंशी फटका बसत असल्याचे चित्र आहे.

सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील २३ साखर कारखान्यांनी चार फेब्रुवारीअखेर एक कोटी ३८ हजार १२० मे. टन उसाचे गाळप करुन एक कोटी १२ लाख ८२ हजार ४९७ क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. गाळपात हुपरीच्या जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याने १० लाख १९ हजार ९०० मे. टन उसाचे गाळप करुन आघाडी घेतली आहे.

जिल्ह्यातील बहुतांश कारखाने सुरू होऊन ८० ते ९० दिवस झाले आहेत. जिल्ह्यात १६ सहकारी व सात खासगी असे एकूण २३ साखर कारखाने सुरू आहेत. सहकारी साखर कारखान्यांनी ७३ लाख ५० हजार २३८ मे. टनाचे तर खासगी कारखान्यांनी २६ लाख ८७ हजार ८८२ मे. टनाचे गाळप केले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी केलेले गाळप, उत्पादन पुढीलप्रमाणे : अनुक्रमे कारखान्याचे नाव (केलेले गाळप टनात) व (केलेले साखर उत्पादन क्विंटलमध्ये) : जवाहर हुपरी (१०,१९,९००) (११,८४,८६०), कोरे, वारणा (८,१५,१५०), (७,७२,८६०) तात्यासाहेब (८,१४,२९५) दत्त शिरोळ (७,८९,८२०), दालमिया आसुर्ले पोर्ले (६,६३,७९०) (८,२६,५२०), छ. शाहू कागल (६,६२,६०५) (७,४९,७५०), दुधगंगा बिद्री (५,७२,६२६) (६,८४,३००).

सरसेनापती संताजी घोरपडे, बेलेवाडी (५,३८,९८५), (५,४१,४५०), पंचगंगा रेणुका शुगर्स (४,७७,५८०) (५,८१,८७०), ओलम अॅग्रो इंडिया, राजगोळी खुर्द (४,४९,५७८) (५,३३,४६०), डी. वाय. पाटील, असळज (४,२०,८५०), (४,३९,७५०), कुंभी कासारी, कुडित्रे (४,०३,३३०) (४,९९,५५०), गुरुदत्त शुगर्स, टाकळीवाडी (३,७४,६५०) (३,९२,६८०), दौलत हलकर्णी (३,३८,०३०) (३,५५,३४०), शरद नरंदे (३,२५,१९०) (३,७२,९००), सदाशिवराव मंडलिक, हमिदवाडा (३,२२,१५०) (३,६५,८००).

उदयसिंगराव गायकवाड, बांबवडे (३,२२,१११) (३,४८,४९०), भोगावती परिते (३,१७,९५०) (३,८१,३७०), छ. राजाराम कसबा बावडा (२,७८,८५०) (३,१९,७२०), इको केन एनर्जी, म्हाळुंगे (२,५२,४१५) (२,७३,८२५), अथणी शुगर, तांबाळे (२,४८,७५१) (२,८०,१६०), आजरा गवसे (२,१०,५४०) (२,५१,५००), रिलायबल शुगर, फराळे (१,५९,७१३) (१,८६,४३२), आप्पासाहेब नलवडे, गडहिंग्लज (९१,३७०) (१,०७,८००)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT