Sugar Commissioner Transfer : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागीय आयुक्तांसह साखर आयुक्तांची बदली

IAS Officers Transfer : आगामी काळात लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.
Sugar Commissioner Transfer
Sugar Commissioner Transferagrowon
Published on
Updated on

Maharashtra Government News : आगामी काळात लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. दरम्यान काल सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये पुणे विभागीय आयुक्तांसह साखर आयुक्तांची बदली करण्यात आली आहे.

पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांची राज्याचे सहकार आयुक्त म्हणून, तर अनिल कवडे यांची साखर आयुक्त म्हणून सोमवारी बदली करण्यात आली.

याचबरोबर राज्यातील अन्य पाच आय. ए. एस. अधिकाऱ्यांच्या बदल्याही करण्यात आल्या. यात गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांची 'हापकीन'च्या व्यवस्थापकीय संचालकपदी, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. के. खिलारी यांची इतर बहुजन समाज कल्याण विभागाचे संचालक म्हणून बदली झाली आहे.

Sugar Commissioner Transfer
Sugar Production : देशात यंदा ३१३ लाख टन साखर तयार होण्याची शक्यता

तर चंद्रपूर 'आयटीडीपी'चे प्रकल्प संचालक मुरुगनाथम एम. यांची चंद्रपूर येथेच साहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून तर श्रीमती याशनी नागराजन यांची सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

दरम्यान सौरभ राव यांच्या जागी म्हणजे पुणे विभागीय आयुक्त म्हणून चंद्रकांत पुलकुंडावर यांची नेमणूक करण्यात आली आहे, तर सहकार आयुक्त अनिल कवडे यांची बदली साखर आयुक्त म्हणून झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com