Kolhapur Drought agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Drought : कोल्हापूर जिल्ह्यात करवीर तालुक्यालाही दुष्काळाच्या झळा, ३७ गावांत पाणी टंचाई

Drought In Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात राज्य सरकारने हातकणंगले आणि गडहिंग्लज या दोन तालुक्यात मध्यम दुष्काळ जाहीर केला आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Water Shortage : कोल्हापूर जिल्ह्यात राज्य सरकारने हातकणंगले आणि गडहिंग्लज या दोन तालुक्यात मध्यम दुष्काळ जाहीर केला आहे. परंतु जिल्ह्यात अनेक मंडलात पाऊस कमी झाल्याने अन्य तालुक्यांनाही दुष्काळाच्या झळा बसत आहेत. दरम्यान करवीर तालुक्यातील चार महसूल मंडळांत यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. यामुळे कोल्हापूर शहर असलेल्या तालुक्यातील ३७ गावांत पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

यातच तालुक्यात ९६ गावांत अद्याप पिण्याच्या पाण्याच्या जलजीवन मिशन योजनेची कामे पूर्ण झालेली नाहीत. ही कामे तातडीने मार्गी लावावीत, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. तालुक्यात यावर्षी पावसाळ्यात निगवे दुमाला, मुडशिंगी, इस्पुर्ली, कणेरी या महसूल मंडळांत दुष्काळ घोषित करण्यात आला आहे.

यामध्ये ३७ गावांचा समावेश आहे. करवीर तालुक्यातील निगवे मंडळात निगवे दुमाला, केर्ली, जठारवाडी, भुये, वडणगे, पडवळवाडी, शिये, सादळे मादळे, भुयेवाडी, आंबेवाडी या गावांचा समावेश आहे. मुडशिंगी मंडळात, गडमुडशिंगी, वसगडे, सांगवडे, तासगाव, सांगवडेवाडी या गावांचा समावेश आहे.

इस्पुर्ली मंडळात इस्पुल, नागाव, वडकशिवाले, कळंबे तर्फ ठाणे, कावणे, चुये, दिंडनेली, हणबरवाडी, नंदगाव, खेबवडे, निगवे खालसा या गावांचा समावेश आहे. कणेरी मंडळात कणेरी, कणेरीवाडी, गिरगाव, वडवाडी, दऱ्याचे वडगाव, कोगील बुद्रुक, नेर्ली, विकासवाडी, हलसवडे या गावांचा समावेश आहे.

यावेळी ग्रामीण विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता प्रसाद बारटक्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये नदीला पाणी उपलब्ध असणारी सत्तावीस गावे आहेत. उर्वरित दहा गावांत एप्रिल, मे, जूनमध्ये शेतीसाठी व पिण्यासाठी टंचाई भासण्याची शक्यता आहे.

उन्हाळ्यात काही ठिकाणी शेतीच्या पाणी योजना, खासगी विहिरींचे अधिग्रहण केले जाईल. काही ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करण्याचे नियोजन होईल. डिसेंबरपर्यंत पाणी पुरेल. यानंतर एप्रिल, मे, जूनमध्ये टंचाई जाणवण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषद तालुक्यातील २३ गावांत योजनेचे काम पूर्ण तालुका जलजीवन मिशनमध्ये जिल्ह्यात आघाडीवर असताना, मंजूर ११९ योजनांपैकी फक्त २३ गावांत योजना पूर्ण झाल्या आहेत. यातील ९६ योजना अपूर्ण आहेत. मात्र, यातील ७० टक्के कामे पूर्ण झाली आहेत; तर ५६ गावांत ५० टक्क्यांपर्यंत कामे झाली आहेत, अशी माहिती पाणी पुरवठा विभाग सूत्रांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT