Agriculture Officer agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Officer : अखेर कोल्हापूर जिल्ह्याला पूर्णवेळ कृषी अधिकारी पद मिळाले

Kolhapur : शेती संपन्न असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात पूर्णवेळ कृषी अधिकारी नसल्याने अनेक अडचणींचा सामना करण्याची वेळ येत होती.

sandeep Shirguppe

District Superintendent Agriculture Officer : शेती संपन्न असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात पूर्णवेळ कृषी अधिकारी नसल्याने अनेक अडचणींचा सामना करण्याची वेळ येत होती. दरम्यान जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीपदी जालिंदर पांगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पांगरे यांनी शनिवारी(ता.१४) रोजी पदभार स्वीकारला. अनेक वर्षांपासून हे पद रिक्त होते. आता जिल्ह्याला पूर्णवेळ जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पद मिळाले आहे.

पांगरे यांच्याकडे सध्या रत्नागिरी येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. त्यांनी यापूर्वीही जिल्ह्यात विविध पदांवर सेवा बजावली आहे. २०१३- २०१७ या कालावधीत कृषी आयुक्तालय, पुणे येथे ई-ठिबक सॉफ्टवेअर विकसित करून ऑनलाईन पारदर्शक पद्धतीने सूक्ष्म सिंचन योजनेची अंमलबजावणी केली होती.

या कामामुळे ‘स्कॉच ऑर्डर ऑफ मेरिट अवॉर्ड’ने सन्मानित केले. २०१७- २०२१ या काळात प्रकल्प उपसंचालक (आत्मा) सेवा बजावली. उपविभागीय कृषी अधिकारी करवीरबरोबरच प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व प्रकल्प संचालक, आत्मा कोल्हापूरचा अतिरिक्त पदभार त्यांच्याकडे होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Productivity : शासकीय खरेदीसाठी सोयाबीनची उत्पादकता जाहीर

Vidhansabha Election Result 2024 : लातूर,धाराशिवकरांची महायुतीला पसंती

Gokul Milk : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; आता ‘गोकुळ’ निशाण्यावर

Jalgaon Assembly Election Result 2024 : खानदेशात महायुतीची मुसंडी; काँग्रेसचे दिग्गज पराभूत

Rohit Patil NCP-SP : राज्यातला सर्वात तरूण आमदार राष्ट्रवादीचा; वय अवघे...

SCROLL FOR NEXT