Kolhapur Elephants in Farm agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Elephants in Farm : हत्तींचा बंदोबस्त होणार का? कोल्हापूर जिल्ह्यात शेतकरी हवालदिल

sandeep Shirguppe

Farmer Fared Elephants : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात टस्कर हत्तींचा धुमाकूळ हा नित्याचाच झाला आहे. आजरा तालुक्यात असणाऱ्या हत्तीने पुन्हा गडहिंग्लज तालुक्यात प्रवेश करत शेतीचे नुकसान करण्यास सुरूवात केली आहे.

मागच्या तीन दिवसांपासून मांगनूर तर्फ सावतवाडीच्या जंगलात हत्तीने तळ ठोकला आहे. या दरम्यान उसासह विविध शेती पिकांचे नुकसान केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

कित्येक वर्षांपासून आजरा तालुक्यात टस्कराचा वावर आहे. अधून-मधून तो गडहिंग्लज तालुक्याच्या हद्दीतही येत असतो. गतवर्षी पावसाळ्याच्या दरम्यान हाच हत्ती मासेवाडी- सावतवाडी परिसरात आला होता. त्यानंतर आता पुन्हा तो आजरा तालुक्यातील सुळे, लाकूडवाडीमागें महागावच्या हद्दीतून मांगनूर तर्फ सावतवाडीत दाखल झाला आहे. या प्रवासात या हत्तीने ठिकठिकाणच्या शेतातील पिकांचे नुकसान केल्याचे सांगण्यात आले.

शुक्रवारी (ता. २६) सकाळी आलेल्या या टस्कराने तीन दिवस मांगनूरच्या हद्दीतील जंगलात मुक्काम ठोकला आहे. शेजारीच तलाव असल्याने पाणी पिऊन पुन्हा तो जंगलात जात आहे. या तीन दिवसांत तानाजी चव्हाण, अशोक शिंदे, भाऊसाहेब शिंगटे, प्रकाश पाटील यांच्या शेतातील ऊस, ज्वारी पिकाचे नुकसान केल्याचे सांगण्यात आले.

हुसकावण्याचा प्रयत्न करू नये

गतवर्षीही याच भागात हत्ती आला होता. पुन्हा या परिसरातच हत्तीने मुक्काम ठोकल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण आहे. हत्तीला हुसकावण्याचा प्रयत्न करू नये, तसेच एकट्याने शेतवडीत न जाण्याचे आवाहन वन खात्यातर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, हत्तीच्या रोजच्या हालचालींकडे लक्ष ठेवले असून, अजूनही हा हत्ती मांगनूरच्या जंगलातच असल्याचे वनरक्षक सुनील भंडारी यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT