PM Suryaghar Power Scheme : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे नोकरदार व व्यावसायिकांना प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. विकास सेवा संस्थांच्या माध्यमातून शेतकरी सभासदांना आणि व्यक्तिगत कर्ज योजनेतूनही लाभ घेता येणार आहे. बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत काल मंगळवार(ता.२४) हा निर्णय झाला. जिल्ह्याचे पालकमंत्री व बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ अध्यक्षस्थानी होते.
महिनाभरापूर्वी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शेतकरी सभासद, पगारदार नोकरदार व व्यावसायिकांसाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेसाठी कर्जसुविधा सुरू करावी, अशी मागणी सभासदांनी केली होती. त्यानुसार बँकेने १२ टक्के व्याजदराने या योजना अंमलात आणल्या आहेत.
केंद्र सरकारने देशातील नागरिकांना मोफत वीजपुरवठा करण्याकरिता प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना अमलात आणली आहे. या योजनेंतर्गत ३०० युनिट मोफत वीज मिळणार आहे.
उपाध्यक्ष आमदार राजू आवळे, माजी खासदार प्रा. संजय मंडलिक, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार राजेश पाटील, माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने, माजी आमदार संजय घाटगे, प्रताप माने, बाबासाहेब पाटील - आसुर्लेकर, संतोष पाटील, रणजितसिंह पाटील, सुधीर देसाई, विजयसिंह माने, श्रुतिका काटकर, स्मिता गवळी, कर्मचारी प्रतिनिधी दिलीप लोखंडे, आय. बी. मुन्शी, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरख शिंदे उपस्थित होते.
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत भाग घेणाऱ्या नागरिकांना प्रतिकिलोवॅट ३० हजार याप्रमाणे प्रथम दोन किलोवॅटसाठी ६० हजार आणि तिसऱ्या किलोवॅटसाठी १८ हजार असे एकूण ७८ हजारांचे अनुदान केंद्र शासनामार्फत थेट ग्राहकांच्या खात्यात जमा करण्यात येते. या योजनेकरिता बँकेमार्फत नागरिकांना कर्जही देण्यात येते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.