Bidri Sugar Factory agrowon
ॲग्रो विशेष

Bidri Sugar Factory : मेहुण्या पाहुण्यांमध्ये ए. वाय. पाटलांनी मारली बाजी, राधानगरीचा पहिला कल स्पष्ट

Bidri Sugar Factory election : अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे.

sandeep Shirguppe

Bidri Sugar Factory election result : अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. दरम्यान मतमोजणीचा पहिला कल हाती आला आहे. कागल तालुक्यातील बोळावी, आनुर, सेनापती कापशी, काळमा बेलेवाडी, चिमगाव या गावांतील मतमोजणी पार पडली. यावेळी के. पी. पाटील यांचे विमान सुसाट जात असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. तर विरोधी गटालाही सभासदांनी चांगलीच पसंती दिल्याचे दिसत आहे.

कागल तालुक्यात सत्ताधारी गटाचे के. पी. पाटील यांनी बाजी मारली होती परंतु आता राधानगरी तालुक्यातील गट नंबर १मध्ये आनंदराव यशवंत पाटील (ए.वाय.) (परिवर्तन आघाडी) राजेंद्र पांडुरंग भाटळे (सत्ताधारी आघाडी) राजेंद्र कृष्णाजी मोरे (सत्ताधारी आघाडी) यांनी पुन्हा बाजी मारली आहे. यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत या निवडणुकीच्या निकालाचा अंदाज बांधता येणार नाही असे दिसून येत आहे.

सभासदांचा सत्ताधाऱ्यांवर रोष

मुस्कान लॉन येथे मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर केंद्रावर मतपेटी उघडून मतपत्रिकेचे गठ्ठे बांधताना सभासदांनी नेत्यांचा चांगलाच समाचार घेतल्याचा चिट्ट्या आढळल्या. या चिठ्यां मधून सभासदांनी विद्यमान अध्यक्ष माजी आमदार के.पी. पाटील यांचं कौतुक केलं, तर रोजंदारी कर्मचाऱ्यांचा के.पी. पाटील यांच्यावर रोष व्यक्त केला.

के पी साहेब कारखाना उत्तम चालवला आहे. ऊसाला चांगला दर दिला आहे. विजय नक्की.

एका मतदारानं सर्व उमेदवारांची नावे आणि त्यांना पडलेली मते लिहिली असून खाली “एक्झिट पोल न्हवे...के पी फायनल” असा मजकूर लिहलाय.

केपी साहेबा, तुमचा संपूर्ण कारखाना टेम्पररी सांभाळतात आणि तुम्ही त्यांच्या तोंडाला पानं पुसता. पर्मनंट ना २८ चा ३० टक्के बोनस करतात. परंतु टेम्परेरी सिव्हिलच्या पोरांना दिवाळीत एक साबण जर दिला असता तर त्यांनी तुमचे आभार मानले असते..

केपी साहेबा, तुम्ही हजारो रोजंदारीच्या जीवाशी खेळला, याला देवही माफ करणार नाही.

दरम्यान मतदान पेट्यांमधून चिठ्यांचा ढिग मिळून आलाय, मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी माध्यमांना दाखवण्यास नकार दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Livestock Fodder: जळगाव जिल्ह्यात चारा मुबलक

Government Scheme: सामाजिक बांधिलकी समजून शासकीय योजना राबवा : शैला ए.

Oil Adulteration: भेसळयुक्त खाद्यतेलाचा ४२ हजार २९४ किलो साठा जप्त

Barshi APMC Election: बार्शी बाजार समिती निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरु

Micro Irrigation Scheme: सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ देण्यासाठी विशेष मोहीम

SCROLL FOR NEXT