Agriculture Supervisor Balasaheb Kakade Agrowon
ॲग्रो विशेष

Agrowon Sanvad : कांदा उत्पादनासाठी पंचतत्वांची माहिती गरजेची

Agriculture Supervisor Balasaheb Kakade : ‘‘जमीन, पाणी, बियाणे, खते, कीड व रोग या पंचतत्वांची माहिती असणे गरजेचे आहे. त्यानुसारच चांगले कांदा उत्पादन घेता येऊ शकते,’’ असे प्रतिपादन कृषी पर्यवेक्षक बाळासाहेब काकडे यांनी केले.

Team Agrowon

Shrirampur News : ‘‘जमीन, पाणी, बियाणे, खते, कीड व रोग या पंचतत्वांची माहिती असणे गरजेचे आहे. त्यानुसारच चांगले कांदा उत्पादन घेता येऊ शकते,’’ असे प्रतिपादन कृषी पर्यवेक्षक बाळासाहेब काकडे यांनी केले.

‘अॅग्रोवन’ व ‘कोरोमंडल इंटरनॅशनल लि.’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कांदा व कापूस उत्पादन तंत्रज्ञान’ या विषयावर मक्तापूर (ता. नेवासे) येथील येथील हनुमान मंदिरात ‘अॅग्रो संवाद’ कार्यक्रम घेण्यात आला.

या वेळी ‘कोरोमंडल’चे सहयोगी उपाध्यक्ष जितेंद्र कोळपे, विभागीय कृषिवेत्ता डॉ. विनेश रेगे, विभागीय व्यवस्थापक समाधान बुधवत, कृषितज्ज्ञ प्रणव जाधव, विपणन अधिकारी विक्रम एकोंडे, सुमीत राठोड, रावसाहेब कांगुणे, ‘अॅग्रोवन’चे सहाय्यक व्यवस्थापक महेश बेले, सचिन तवले आदी उपस्थित होते.

काकडे म्हणाले, ‘‘कांदा लागवड करण्यापूर्वी माती परीक्षण करणे गरजेचे आहे. कांदा पिकात पाणी नियोजन (वापसा) करावे. लागवडी अगोदर रासायनिक खतांचे नियोजन करावे. लागवडीपूर्वी जमिनीचा सेंद्रिय कर्ब एक टक्का असावा. कांदा उत्पादनासाठी बीजोत्पादन महत्त्वाचे असते.

एकरी तीन लाख ९१ हजार ५०० रोपांची संख्या असावी. एका बाय एक जागेत नऊ रोपांची लागवड करावी. तणनाशकाचा योग्यवेळी वापर करावा. कीटकनाशक व बुरशीनाशक योग्यवेळी फवारावे. रोपवाटिकेची जागा दरवर्षी बदलावी. काढणीअगोदर बुरशीनाशकाची फवारणी करावी व नंतरच कांद्याची चाळीमध्ये साठवणूक करावी.’’

डॉ. रेगे म्हणाले, ‘‘कांदा व कापूस पिकाच्या एकात्मिक व्यवस्थापनात सेंद्रिय व रासायनिक खतांची गरज असते. शेणखत वापरून जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढतो. ‘थ्री जी’ संकल्पना वापरून शेतीतील उत्पादन वाढीसाठी कोरोमंडलने पर्याय म्हणून खते उपलब्ध केली आहेत.

कोरोमंडल ग्रो-स्मार्ट, ग्रो-प्लस व ग्रो-शक्ती वापरून पिकांची उत्पादकता वाढविता येईल. प्रामुख्याने ग्रोमोर नॅनो डीएपी फवारणीद्वारे द्यावे. स्फुरद, नत्र, पालाश यांसारखे घटक मिळण्यासाठी संयुक्त खते वापरली जातात. आजही प्रत्येक शेतकरी सुपर फॉस्फेट वापरतो. ते खत कोरोमंडलने १९०६ मध्ये बाजारात आणले आहे.’’ बेले यांनी प्रास्ताविक केले. प्रणव जाधव सूत्रसंचालन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain : दिवाळीच्या सणावर संकटाचे ढग

Farmer Relief : पूर्व विदर्भामध्ये ५६ हजारावर शेतकऱ्यांना मदतनिधीची प्रतीक्षाच

Sugar MSP : केंद्राने साखरेची किमान विक्री किंमत ४३०० रुपये करावी

Paddy Harvesting : भुदरगडमध्ये भात कापणीला वेग

Tiger Terror : वाघाच्या दहशतीने शेतीकामेच रखडली

SCROLL FOR NEXT