डॉ. सागर कारंडे, डॉ. दिग्विजय चव्हाण, वैभव थांगेRust Disease in Gram: हरभऱ्याचे पीक सध्या फलोरा आणि घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. यामध्ये काही बुरशीजन्य रोगांमुळे उत्पादनात मोठी घट येते. यापैकी तांबेरा रोग हा एक प्रमुख रोग असून वेळेवर लक्ष न दिल्यास तो संपूर्ण पिकावर पसरू शकतो. त्यामुळे उत्पादनात घट पाहायला मिळते. त्यामुळे शेताची नियमित पाहणी, स्वच्छता आणि गरजेनुसार औषधांची फवारणी केल्यास उत्पादनातील नुकसान टाळता येते..हरभऱ्यावरील तांबेरा रोगतांबेरा रोग हा युरोमायसेस सिसरी-एरिटिनी या बुरशीमुळे होतो. हा रोग प्रामुख्याने पानांवर दिसतो आणि हळूहळू संपूर्ण झाडावर पसरतो..Harbhara Mulkuj: सोप्या पद्धतींनी रोखा हरभऱ्यावरील मूळकुज रोगाचा धोका.रोगाची लक्षणेया रोगाची सुरुवात साधारणपणे फुलोरा आल्यानंतर होते. त्यामुळे सध्या पिकाचे निरीक्षण करणे आवश्यक आहे.सुरुवातीला पानांवर लहान, गोल किंवा अंडाकृती आकाराच्या दालचिनी रंगाच्या भुकटीसारख्या गाठी (पुटकुळ्या) दिसतात. या गाठी आकाराने फार छोट्या असतात.काही दिवसांत या गाठी एकत्र येऊन मोठ्या होतात आणि त्यांचा रंग गडद होतो. मोठ्या गाठीभोवती लहान गाठींचे वर्तुळ दिसते..हा रोग पानांच्या वरच्या व खालच्या दोन्ही बाजूंवर दिसतो, मात्र खालच्या पानांवर जास्त प्रमाणात आढळतो.रोग वाढल्यावर शेंगांवरही (घाटांवर) गाठी दिसू लागतात.पीक पिकण्याच्या काळात रोग अधिक तीव्र होतो व संपूर्ण पानांचा भाग व्यापतो. त्यामुळे झाड कमजोर होते व उत्पादन घटते..रोग वाढण्यासाठी अनुकूल परिस्थितीतांबेरा रोग थंड व दमट हवामानात जलद वाढतो. सतत दव, ढगाळ हवामान आणि जास्त ओलावा असल्यास रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. सध्याचे वातावरण या रोगासाठी अतिशय अनुकुल आहे त्यामुळे त्यावर व्यवस्थापन करावे..व्यवस्थापन कसे करावे?रोग टाळण्यासाठी आणि नियंत्रणासाठी विविध उपाय अवलंबता येतात. प्रतिबंधात्मक उपायांमध्ये हरभऱ्याची लवकर पेरणी करावी. शेताची आठवड्यातून किमान एकदा पाहणी करावी. रोगट पाने व झाडांचे भाग तोडून शेताबाहेर टाकावेत. पीक काढल्यानंतर उरलेले अवशेष जाळून किंवा कुजवून नष्ट करावे. उशिरा पाणी देणे टाळावे आणि पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. शेतातील तण वेळेवर काढावे. कारण त्यामुळे रोग वाढण्याची शक्यता असते.रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यास तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार रासायनिक फवारणीचे नियोजन करावे. .डॉ. सागर कारंडे, वनस्पती रोगशास्त्र व अणूजीवशास्त्र विभाग, मो. ९५४५६७२२७५डॉ. दिग्विजय चव्हाण, वनस्पती रोगशास्त्र व अणूजीवशास्त्र विभाग,वैभव थांगे (पीएचडी संशोधक), अनुवंशशास्त्र आणि वनस्पती प्रजनन विभाग, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.