Nanded News: नांदेड जिल्ह्याच्या सन २०२६-२७ यावर्षीच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या ७३२ कोटी २६ लाखांच्या प्रारूप आराखड्यास गुरुवारी (ता. २२) जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी दिली. पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. .जिल्हा नियोजन भवनात बैठकीला खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछेडे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, पोलिस अधीक्षक अविनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे, विविध विभागाचे अधिकारी यांची प्रत्यक्षात तर पालकमंत्री अतुल सावे, खासदार रवींद्र चव्हाण, डॉ. शिवाजी काळगे, .Akola DPDC : नियोजन समितीच्या बैठकीत दलित वस्ती निधीच्या मुद्यावरून घमासान.नागेश पाटील आष्टीकर, आमदार विक्रम काळे, प्रताप पाटील चिखलीकर, भीमराव केराम, बालाजी कल्याणकर, जितेश अंतापुरकर, बाबुराव कदम, आनंदराव तिडके, श्रीजया चव्हाण यांची दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थिती होती. जिल्ह्याच्या २०२६-२७ च्या ७३२ कोटी २६ लाखाच्या मर्यादेतील आराखड्यात भरीव वाढ करण्याची शिफारस राज्यस्तरीय बैठकीत करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. सोबतच सन २०२५-२६ च्या मंजूर आराखड्यातील संपूर्ण निधी खर्च करण्याचे निर्देश त्यांनी दिले. शासनाने घातलेली मर्यादा व प्रत्यक्ष मागणी यावरून जिल्ह्याचा २०२६-२७ चा नियोजनाचा आराखडा ठरणार आहे. .Satara DPDC : सातारा जिल्ह्यासाठी २३८.७५ कोटींच्या वाढीव आराखड्यास मंजुरी.या आराखड्यामध्ये जिल्ह्यातील यंत्रणेने प्रस्तावित केलेल्या मागणीप्रमाणे निधी मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी स्पष्ट केले. नियोजन विभागाने सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपायोजना, आदिवासी उपाययोजना, या तीनही घटकांना मिळून सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ७३२ कोटी २६ लाखांची आर्थिक मर्यादा निर्धारित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील यंत्रणेने मात्र जवळपास एक हजार ८६९ कोटी २८ लाखांची मागणी केली आहे. वित्त व नियोजन मंत्र्यांच्या बैठकीमध्ये आता जिल्ह्याच्या डीपीडीसीच्या अंतिम प्रारूपाला मान्यता मिळणार आहे. यामध्ये जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण साठी शासनाने ५०६ कोटी ३८ लाख, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी १६४ कोटी, आदिवासी उपयोजनेसाठी ६१ कोटी ८८ लाख ७१ हजार रुपये आर्थिक मर्यादा केली आहे..तीस टक्केच निधी खर्चयावर्षी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणचे ५८७ कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेचे १६४ कोटी, आदिवासी उपयोजनेचे ६४ कोटी २० लाख २० हजार रुपयाचा निधी जिल्ह्यातील सर्व शाखांना मार्च अखेरपर्यंत खर्च करायचे आहे. या निधीपैकी आतापर्यंत ३०.३८ टक्के निधी खर्च झाला आहे. आतापर्यंत वितरित २९० कोटी १९ लाख ६० हजार रुपयापैकी २४७ कोटी ६८ लाख ७४ हजार रुपयाचा निधी खर्च झालेला आहे. वितरित तरतुदीच्या ३० टक्के निधी खर्च झाला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.