Raigad News: सुधागड तालुक्यातील पाच्छापूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्या आणि त्याच्या पिल्लांच्या दर्शनामुळे परिसरात दहशत पसरली आहे. त्यामुळे वन विभागाने आता ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात रात्रीची गस्त वाढवण्यात आली असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी विविध ठिकाणी जनजागृतीचे फलक लावण्यात येत आहेत..पाच्छापूरसह आजूबाजूच्या आसानवाडी, पोटलज आणि धोंडसे या गावांमध्ये बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. .Leopard Sighting: गिरड परिसरात बिबट्याचा वावर.याची दखल घेत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेटी देऊन पगमार्क्सची पाहणी केली. तसेच बिबट्याशी सामना झाल्यास काय करावे, याबद्दल ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. .Leopard Sighting: वडगावात बिबट्याचा वाढता वावर.गावातील मुख्य चौक आणि वर्दळीच्या ठिकाणी माहितीपर फलक लावून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे..पाच्छापूर परिसरात बिबट्याचा वावर लक्षात घेता आम्ही रात्रीची गस्त वाढवली आहे. लोकांमध्ये जनजागृती करीत आहोत. वन विभागाचे कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. ग्रामस्थांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि बिबट्या दिसल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा.- विशाल सोनवणे, वनपरिक्षेत्र अधिकारी, सुधागड-पाली.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.