Kisan Sabha Agrowon
ॲग्रो विशेष

Kisan Sabha : किनवट तहसीलसमोर किसान सभेचे धरणे आंदोलन

Kisan Sabha Protest : गायरान, वन, देवस्थान, भोगवटदार जमिनी कसत असलेल्या जमिनीच्या संघर्षाच्या अनुषंगाने तीन वेळा लॉँग मार्च, मंत्र्यांचा घरावर मोर्चा असे अनेक आंदोलन करून राज्य सरकारला अनेक मागण्या मान्य कराव्या लागल्या.

Team Agrowon

Nanded News : अखिल भारतीय किसान किसान सभेच्या वतीने शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन शेतमजुरांना स्वतःच्या पिढ्यान् पिढ्या कसत असलेल्या वनजमीन, देवस्थान जमीन, गायरान जमीन, महसूल जमिनीची मालकी मिळावी, यासाठी सोमवारी (ता. ५) तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

गायरान, वन, देवस्थान, भोगवटदार जमिनी कसत असलेल्या जमिनीच्या संघर्षाच्या अनुषंगाने तीन वेळा लॉँग मार्च, मंत्र्यांचा घरावर मोर्चा असे अनेक आंदोलन करून राज्य सरकारला अनेक मागण्या मान्य कराव्या लागल्या.

परंतु अजूनही मंजूर मागण्यांची अंमलबजावणी झाली नसल्याने किसान सभेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली होती.

या वेळी आंदोलनात शेतकरी नेते अर्जुन आडे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर टीका करीत आश्‍वासनांचे गाजर न दाखवता कसत असलेल्या आणि ताब्यात असलेल्या जमिनीचे मालकी अधिकार बहाल करा. अन्यथा, शेतकरी पुन्हा एकदा लॉँग मार्च काढतील, असा इशारा दिला. या वेळी आंदोलनाच्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांना देण्यात आले.

आंदोलनात खंडेराव कानडे, शेषराव ढोले, अडेलु बोनगीर, मनोज सल्लावार, जनार्दन काळे, प्रशांत जाधव, रंगराव चव्हाण, आनंद लव्हाळे, परमेश्‍वर गायकवाड, देविदास राठोड, नंदु मोदुकवार, शैलीया आडे, सुनीता बोनगीर, सुरेखा मेंढके, राजू केंद्रे, यमुना काळे, टिकाराम राठोड, अमरसिंग चव्हाण, आकाश आडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT