Delhi Farmers' Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Delhi Farmers' Protest : दिल्लीत शेतकऱ्यांची महापंचायत; पंजाबमधील शेतकरी ८०० हून अधिक बस, ट्रक आणि अनेक गाड्यांमधून दिल्लीच्या दिशेने

Aslam Abdul Shanedivan

Pune News : हमीभाव कायद्यासह विविध प्रमुख मागण्यांसाठी पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी शंभू आणि खनौरी सीमेवर आंदोलन करत आहे. या आंदोलनाचा गुरूवार (ता. १४) ३१ वा दिवस आहे. तर आंदोलक शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी १३ फेब्रुवारीपासून आंदोलन करत आहेत. शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. तर दिल्लीकडे कूच करण्याची रणनीती शेतकऱ्यांनी आखत गुरूवारी (ता. १४) दिल्लीतील रामलीला मैदानावर 'किसान मजदूर महापंचायत' भरणार आहे. यासाठी पंजाबमधील हजारो शेतकरी ८०० हून अधिक बस, ट्रक आणि अनेक गाड्यांमधून दिल्लीच्या दिशेने बुधवारी (ता.१३) निघाले. ही महापंचायत संयुक्त किसान मोर्चाने आयोजित केली आहे. 

शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाकडून दिल्लीतील रामलीला मैदानावर 'किसान मजदूर महापंचायत' आयोजित करण्यात आली आहे. या महापंचायतीत केंद्र सरकारच्या धोरणांविरुद्ध ‘लढा तीव्र’ करण्याचा ठराव मंजूर केला जाण्याची शक्यता आहे. पीटीआयलाने एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीप्रमाणे, दिल्ली पोलिसांनी काही अटींसह शेतकऱ्यांच्या मेळाव्याला परवानगी दिली आहे. तसेच महापंचायतमध्ये ५ हजारांपेक्षा जास्त लोक सहभागी होणार नाहीत, याची दक्षता घेण्यासह ठिकाणाजवळ ट्रॅक्टर ट्रॉलींना परवानगी नसेल, असे म्हटले आहे. 

पंजाबमधील शेतकऱ्यांचा हुंकार 

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंजाब आणि हरियाणामधील शेतकरी एकवटला आहे. तर पंजाबमधील हजारो शेतकरी या आंदोलनात सहाभागी झाला आहे. संयुक्त किसान मोर्चाने दिल्लीतील रामलीला मैदानावर आयोजित केलेल्या 'किसान मजदूर महापंचायत'ला मोठ्या संख्येने शेतकरी निघालेले आहेत. पंजाबमधील शेतकरी ८०० हून अधिक बस, ट्रक आणि अनेक गाड्यांमधून दिल्लीकडे निघाले आहेत. 

वाहतुकीवर परिणाम 

गुरुवारी रामलीला मैदानावर होणाऱ्या 'किसान मजदूर महापंचायत'मुळे राष्ट्रीय राजधानीच्या विविध भागात वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. याप्रमाणे गौतम बुद्ध नगर पोलिसांनी नोएडा-दिल्ली मार्गावरील वाहतूक मंद होऊ शकते, असा इशारा दिला आहे. 

'किसान मजदूर महापंचायत'मधील महत्वाचे मुद्दे 

१) संयुक्त किसान मोर्चाने म्हटले आहे की, ते रामलीला मैदानावर 'किसान मजदूर महापंचायत' आयोजित करेल. जिथे सरकारच्या धोरणांविरुद्ध लढा तीव्र करण्याचा ठराव मंजूर केला जाईल.

२) संयुक्त किसान मोर्चाचा एक भाग असणाऱ्या भारतीय किसान यूनियन (एकता-डाकौंडा) च्या धानेर गटाचे प्रमुख मनजीत धानेर यांनी, या महापंचायतला पंजाबमधून ३० हजार हून अधिक शेतकरी येतील अशी शक्यता वर्तवली आहे. 

'किसान मजदूर महापंचायत'मधील महत्वाचे मुद्दे

३) याआधी मंगळवारी संयुक्त किसान मोर्चाने एका निवेदनात म्हटले आहे की, दिल्ली पोलिसांनी गुरूवारी होणाऱ्या महापंचायतला परवानगी दिली आहे. 

४) तसेच रामलीला मैदानावर महापंचायतीसाठी महापालिका प्रशासनाच्या सहकार्याने पार्किंग पाणी, स्वच्छतागृहे आणि रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यास ही सांगितले आहे. 

५) याबाबत पोलिस उपायुक्त एम हर्षवर्धन यांनी पीटीआयला सांगितले की, शेतकऱ्यांना ५,००० पेक्षा कमी लोकांसह 'महापंचायत' आयोजित करण्याची परवानगी दिली आहे. 

'किसान मजदूर महापंचायत'मधील महत्वाचे मुद्दे

६) याबाबत शेतकऱ्यांनी शपथपत्र दिले असून दिल्लीत मोर्चा काढणार नाही असे आश्वासन शेतकरी नेत्यांनी दिले आहे. 

७) पीटीआयच्या वृत्तानुसार, अन्य एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दुपारी २.३० नंतर त्यांचा कार्यक्रम संपल्यानंतर लगेचच शेतकऱ्यांना जागा रिकामी करावी लागेल. 

'किसान मजदूर महापंचायत'मधील महत्वाचे मुद्दे

८) तसेच शेतकऱ्यांनी आश्वासने न पाळल्यास आणि दिल्लीतील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यात सहभागी असल्यास कठोर कारवाई केली जाऊ शकते

९) गौतम बुद्ध नगर पोलिसांनी प्रवाशांना सावध करताना, "वाहतुकीची गैरसोय झाल्यास, ट्रॅफिक हेल्पलाइन क्रमांक ९९७१००९००१ वर संपर्क साधा. गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करा." असे आवाहन केले आहे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean MSP Procurement : सरकार सोयाबीनचे पेमेंट २ दिवसांत देणार ? उद्यापासून हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी नावनोंदणी सुरु होणार

Soybean Cotton Subsidy : दीड लाखावर शेतकरी कापूस, सोयाबीन अर्थसाह्यापासून वंचित राहण्याची शक्यता

E-Peek Pahani : खरिपातील ७ लाख ३४ हजार हेक्टर क्षेत्राची ई-पीकपाहणी

Agrowon Podcast : कांदा भावात नरमाई; कापूस, सोयाबीन, डाळिंब तसेच काय आहेत आले दर ?

Strawberry Nurseries Rain Damage : पावसाने स्ट्रॉबेरी रोपवाटिकांचे नुकसान, लागवडी रखडल्याने शेतकरी चिंतेत

SCROLL FOR NEXT