Kisan Agriculture Exhibition 2023 Agrowon
ॲग्रो विशेष

Kisan Agriculture Exhibition 2023 : मोशी येथे किसान कृषी प्रदर्शन सुरू

Agriculture Exhibition : भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन ‘किसान’ला बुधवारपासून (ता. १३) सुरुवात झाली. हे प्रदर्शन रविवार (ता.१७) पर्यंत पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्र, मोशी (भोसरीजवळ) पुणे येथे सुरू राहणार आहे.

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Pune News : पुणे : भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन ‘किसान’ला बुधवारपासून (ता. १३) सुरुवात झाली. हे प्रदर्शन रविवार (ता.१७) पर्यंत पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्र, मोशी (भोसरीजवळ) पुणे येथे सुरू राहणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवारी सकाळी ९ वाजता प्रदर्शन स्थळी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या पहिल्या गटाच्या हस्ते करण्यात आले आहे.

हे प्रदर्शन १५ एकर क्षेत्रांवर असून, या ठिकाणी ५०० हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था, नवउद्योजक शेतीतील नवीन तंत्रज्ञान व उत्पादने शेतकऱ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध झाली आहेत.

हे प्रदर्शन पाच दिवस सुरू राहणार असून, आधुनिक तंत्रज्ञान व नवे विचार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हे किसान प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. यंदा किसान प्रदर्शनात संरक्षित शेती, पाणी नियोजन, कृषी निविष्ठा, यंत्रसामग्री, पशुधन, जैव, ऊर्जा, वाटिका व  शेती लघू उद्योग अशी विभागवार दालने उभी करण्यात आलेली आहेत. प्रत्येक दालनात त्या विशिष्ट विभागातील स्टॉल शेतकऱ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.

शेतीसाठी लागणारी यंत्रे व उपकरणांचे प्रदर्शन खुल्या जागेत केले आहे. प्रदर्शनात कृषी क्षेत्रात येऊ घातलेले नवीन तंत्रज्ञान व त्यामुळे निर्माण होणाऱ्या संधीची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, कृषी क्षेत्रातील नवउद्योजकांसाठी ‘स्पार्क’ हे दालन आहे. ज्यामध्ये नवीन तंत्रज्ञान व नवीन कल्पनांना चालना देण्यात आली आहे.

पूर्वनोंदणी आवश्‍यक
प्रदर्शनाच्या प्रवेशद्वारावर मोबाइल ॲपद्वारे आगाऊ नावनोंदणी करण्याची सोय केली आहे. ३०,००० हून अधिक शेतकऱ्यांनी पूर्वनोंदणी केली असून ही संख्या १००,००० ओलांडण्याची अपेक्षा आहे.

कंपन्यांची माहिती व संपर्क
किसान मोबाइल ॲपवर सहभागी कंपन्या व त्यांच्या उत्पादनांची माहिती उपलब्ध आहे. नावनोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा संस्थांशी संवाद प्रदर्शनाच्या आधीपासूनच सुरू झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance Claim: पीक विमा क्लेम ११० टक्क्यांवर; नांदेडसाठी ३११ कोटींचा भार

Solapur Development Works Issues: तीनशे कोटींच्या विकासकामांना ‘ब्रेक’

Water Scarcity: गढूळ पाण्यावर ग्रामस्थांचा जीव

Onion Price Crash: कांद्याच्या गोणी बाजारातच सोडून हताश शेतकरी घरी परतले

Fertilizer Black Marketing: खताच्या काळाबाजाराला घालणार लगाम

SCROLL FOR NEXT