PMFBY Scheme: पीक विमा योजनेत लागू असलेल्या ८० ते ११० टक्के जोखीम वाटप (रिस्क शेअरिंग) मॉडेलमुळे नांदेड जिल्ह्यासाठी राज्य शासनावर सुमारे ३११ कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. जिल्ह्यात नुकसान भरपाईचा (क्लेम) दर ११० टक्क्यांपेक्षा अधिक गेल्याने विमा कंपन्यांचा तोटा शासनाला भरून देण्यासाठी सुमारे ३५० कोटी द्यावे लागणार आहे. ही रक्कम मिळाल्यानंतर नांदेडमधील शेतकऱ्यांना विमा परतावा मिळण्याची शक्यता आहे..पीक विमा योजनेत शेतकऱ्यांकडून अत्यल्प प्रीमियम घेतला जातो, तर उर्वरित प्रीमियम केंद्र व राज्य शासनाकडून भरला जातो. मात्र, प्रत्यक्ष हंगामात नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, दुष्काळ किंवा कीडरोग यामुळे नुकसान वाढल्यास क्लेमची रक्कम प्रीमियमपेक्षा जास्त होते. अशा परिस्थितीत ८० ते ११० टक्के मॉडेलनुसार अतिरिक्त जोखीम शासनावर येते. या मॉडेलनुसार, जर क्लेमची रक्कम प्रीमियमच्या ८० टक्क्यांपेक्षा कमी असेल तर विमा कंपन्यांना झालेल्या नफ्यातून काही हिस्सा शासनाला परत द्यावा लागतो. .Crop Insurance Claim : विम्यासाठी योग्य नुकसानीच्या पूर्वसूचना कशा द्यायच्या? योग्य पर्याय कसे निवडायचे?.८० ते ११० टक्क्यांदरम्यानचा भाग सामान्य मानला जातो. मात्र, क्लेमची रक्कम ११० टक्क्यांपेक्षा जास्त गेल्यास विमा कंपन्यांचा तोटा केंद्र व राज्य शासनाला उचलावा लागतो. यंदा अनेक जिल्ह्यात पावसाचे अनियमित वितरण आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान भरपाईचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ११० टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली. नांदेडला पहिल्या टप्यात ८१३ कोटींचा विमा मंजूर झाला आहे. यापुढे यात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्याचा वाटा सुमारे ३११ कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्य शासनाची ही रक्कम मिळाल्यानंतर उर्वरित परतावा मिळणार आहे..Crop Insurance Digi Claim : पीकविमा योजनेत येणार पार्दशकता ; केंद्र सरकारकडून डिजिक्लेम सुविधा लाँच .२१ मंडळाचा विमा बाकीनांदेड जिल्ह्यात सोयाबीन पिकांचा विमा सर्वच ९३ मंडळात लागू झाला आहे. यातील २१ मंडळातील शेतकऱ्यांची रक्कम खात्यावर अपलोड होणे बाकी आहे. यातील काही मंडळात कंपनीकडून आलेले आक्षेप तसेच काही तांत्रिक अडचणीमुळे विमा प्रलंबीत आहे. हा विमा पुढील काळात शेतकऱ्यांना मिळेल, अशी माहिती मिळाली..नांदेडमधील २१ मंडळात किनवटमधील इस्लापूर, मांडवी, जलधारा, किनवट व सिंदगी. माहूरमधील वाई बाजार, माहूर, वानोळा व सिंदखेड. कंधारमधील दिग्रस, कंधार व कुरुळा. नांदेडमधील नांदेड ग्रामीण व नांदेड शहर, नायगावमधील बरबडा व घुंगराळा. धर्माबादमधील सिरजखोड व धर्माबाद, उमरीमधील धानोरा, मुदखेडमधील बारड व भोकरमधील किनी मंडळाचा समावेश आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.