Crop Loan  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan : जेवढे भरले तितकेच नव्याने पीककर्ज!

Team Agrowon

Akola News : सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून पीककर्ज वाटप केले जात असून ‘जेवढे भराल, तितकेच घ्या’ असा कारभार सुरू आहे. शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार होत असल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत.

तेल्हारा तालुक्यात दरवर्षी शेतकरी शेतीमशागतीसाठी सेवा सहकारी सोसायटीमार्फत पीककर्ज घेतात. दरवर्षी २० टक्के कर्ज वाढवून मिळते. मात्र सेवा सहकारी सोसायट्यांनी कर्ज वसूल करीत शेतकऱ्याने जेवढे भरले तितकेच कर्जवाटप केले जात आहे. यामुळे शेतकरी कोंडीत सापडला आहे.

तेल्हारा तालुक्यातील शेतकरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमधून सेवा सहकारी सोसायट्यांमार्फत पीककर्ज घेत असतात. दरवर्षी नित्यनेमाने पीककर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना २० टक्के कर्ज वाढवून मिळते.

मात्र सध्या सेवा सहकारी सोसायट्यांनी पीककर्ज वाटप सुरू केले असून ज्या शेतकऱ्यांनी कर्ज भरले त्याच शेतकऱ्यांना जेवढी कर्ज रक्कम भरली असेल तितकेच कर्ज वाटप होत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

वेगवेगळ्या बॅंकेसाठी वेगवेगळे नियम

स्टेट बँक, ग्रामीण बँक, सेंट्रल बँकेमध्ये पीककर्ज घेणाऱ्या बागायतदार शेतकऱ्यांना दरवर्षी एकरी ५० हजार रुपयांपर्यंत पीककर्ज वाटप करण्यात येते. घेतलेल्या कर्जाचा भरणा केल्यानंतर दोन-तीन दिवसांनी शेतकऱ्यांना पुन्हा पीककर्ज वाटप करण्यात येते. मात्र सेवा सहकारी सोसायटीमार्फत पीककर्ज वाटप होणाऱ्या शेतकऱ्यांकडून शेअर्स कपात केली जाते.

शासन शेतकऱ्यांचे पीक उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढावे यासाठी सिंचनासाठी वेगवेगळे अनुदान देते. शेतकऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच सेवा सहकारी संस्था मात्र शेतकऱ्यांना तोडके पीककर्ज वाटप करीत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

परिपत्रकानुसारच शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पीककर्ज वाटप व्हावे यासाठी तसा ठराव सोसायटीच्या मासिक सभेत घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ.
- किशोरकुमार खारोडे, अध्यक्ष, सेवा सहकारी सोसायटी तळेगाव बाजार, ता. तेल्हारा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan Scheme : पी.एम.किसान योजना; अठराव्या हप्त्यास शेतकरी मुकणार, तेरा हजार खाती आधार लिंकविना

Indian Agriculture : शिळ्या कढीला ऊत

Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुका तीन टप्प्यांत

Budget Update : अर्थसंकल्पातून प्रत्येक समाज घटकाला न्याय : अजित पवार

Watershed Mismanagement Case : पाणलोट गैरव्यवहारप्रकरणी फौजदारी कारवाई करा

SCROLL FOR NEXT