Crop Loan : खरीप हंगामासाठी वाढीव कर्ज देण्याची शेतकऱ्यांची मागणी

Kharif Season 2024 : आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वाढीव पीककर्ज दिले जावे, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
Kharip Crop Loan
Kharip Crop Loan Agrowon
Published on
Updated on

Washim News : आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वाढीव पीककर्ज दिले जावे, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे. २०२३-२४ या खरीप हंगामात घेतलेल्या पीक कर्जाचा भरणा ३१ मार्चपूर्वी करावयाचा होता. त्यासाठी अनेकांनी हातउसने पैसे घेत भरणा केला.

या पैशांची परतफेड तसेच हंगामासाठी बी-बियाणे खरेदी, खत निविष्ठा व व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांना नवीन हंगामातील पीक कर्जाची प्रतीक्षा लागली आहे. शेतकऱ्यांची खरीप हंगामासाठी पेरणीपूर्व नियोजनाची तयारी सध्या सुरू आहे.

Kharip Crop Loan
Crop Loan : शंभर संस्थांतील पीककर्ज वाटप थेट बँकेतून

थकीत कर्जाचा भरणा करून कर्ज मिळावे, यासाठी नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांनी आपल्याकडील थकीत कर्जाचा भरणा केला. त्यासाठी अनेकांना मोठी कसरत करावी लागली.

कर्जाचा भरणा करण्यासाठी जुळवाजुळव म्हणून काहींनी व्याजाने तर काहींनी हातउसने पैसे घेऊन कर्ज भरले. थकीत कर्ज भरल्याने आता सन २०२४-२५ च्या खरीप हंगाम पीक कर्जासाठी शेतकरी पात्र झाले असल्याने लवकरात लवकर कर्ज मिळावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

Kharip Crop Loan
Crop Loan : सलग पाचव्या वर्षी पीककर्जाचे उद्दिष्ट अपूर्ण

‘पीककर्जाचे प्रमाण वाढावे’

शेतकऱ्यांच्या शेतीची किंमत अंदाजे १० ते १५ लाख रुपये एकर असताना पीककर्ज प्रती एकरी केवळ २० ते २५ हजार दिले जाते. परंतु बियाणे, खते व औषधांच्या वाढत्या किमतीमुळे मिळालेल्या पीक कर्जात शेतीसाठीचा खर्च भागवणे अवघड झाले आहे.

यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे शासनाने वाढीव दराने कर्ज देण्याबरोबरच कर्जमाफी करावी, अशी मागणी देखील शेतकऱ्यांतून केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com