Water Scarcity Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : खटावच्या पाणीप्रश्नी शेतकरी आक्रमक

Team Agrowon

Satara News : खटाव तालुक्यातील बहुतांश भागात यावर्षी अपेक्षित पाऊस न झाल्याने तालुक्यातील शेती, पाणी परिस्थिती अडचणीत आली आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी शेती, पाणी प्रश्नावर न्याय मागण्यासाठी खटाव तालुका पाणी संघर्ष समितीची स्थापना केली आहे.

या प्रश्नाबाबत संघर्ष समितीच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. तालुक्यातील अंबवडे, बनपुरी, येरळवाडी, नढवळ, गणेशवाडी, कातरखटाव पिंपळवाडीसह लाभ क्षेत्रातील गावांच्या शेतकऱ्यांची येथे नुकतीच बैठक झाली.

तालुक्यात पावसाअभावी जमिनीतील पाण्याची पातळी खोल गेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शेती व पिण्याची पाण्याची समस्या, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. विहिरींनी तळ गाठल्याने पाण्यावाचून पिके अडचणीत आली आहेत. येरळवाडी मध्यम प्रकल्पानेही तळ गाठला असल्‍याने, शेती अडचणीत आली आहे.

जिहे-कठापूर योजनेमधून माणगंगा धरण भरले जात आहे. गेले अनेक दिवस चातक पक्षाप्रमाणे वाट पाहणाऱ्या माण तालुकावासीयांच्या दृष्टीने ही बाब आनंददायी आहे. मात्र, खटाव तालुक्यातील जनतेवर अन्याय का? असा सवालही या वेळी उपस्थित करण्यात आला.

खटाव तालुक्यावर शेती, पाणी प्रश्नाबाबत अन्याय होत असल्याने हा लढा नेटाने लढण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते व शेतकरी एकत्र आल्याचे या वेळी सांगण्यात आले. याशिवाय येरळा प्रकल्पातील शेतकऱ्यांचे विद्युत पंप प्रशासनाने जप्त केले आहेत. परिणामी अनेकांची पिके पाण्याअभावी वाळून चालली आहेत.

जिहे-कठापूरद्वारे दुजाभाव

जिहे-कठापूर योजनेतून तालुक्यातील येरळा नदीवरील १५ बंधारे भरून ११ हजार ७०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याची योजना आहे. गेल्या वर्षात जिहे-कठापूर योजनेचे चार वेळेला पाणी सोडण्यात आले. मात्र, भुरकवडी बंधाऱ्याच्या पुढे ते येऊ दिले जात नाही. त्यामुळे खटाव तालुक्याला पाण्यापासून उपेक्षित ठेवले जात असल्याची भावना तालुकावासीयांच्या मनात निर्माण झाली आहे, असेही मत या वेळी मांडण्‍यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT