Kharif Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : सातारा जिल्ह्यात ४,१८५ हेक्टरवर खरीप पेरणी

Kharif Season : खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी खत पुरवठ्याचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी दिली आहे.

Team Agrowon

Satara News : जिल्ह्यात खरीप हंगाम प्रमुख हंगाम आहे. खरिपात ४१८५.४५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी खत पुरवठ्याचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी दिली आहे.

जिल्ह्यात एकूण २९ हजार ३०९ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. शेतकरी बांधवांनी विशिष्ट कंपनी किंवा वाणाच्या बियाण्याचा आग्रह न धरता दर्जेदार बियाणे वापरावे असे आवाहन करण्यात येत आहे.

कृषी विभागामार्फत कृषी उन्नती योजना, अन्न व पोषण अंतर्गत सोयाबीन पिकासाठी ग्रामबीजोत्पादन अंर्तगत ६० टक्के अनुदानावर सोयाबीनचे बियाणे उपलब्ध असून, या बियाणांसाठी २० रुपये प्रती किलोप्रमाणे अनुदान असून ६० रुपये किलोप्रमाणे शेतकरी हिस्सा भरून बियाणे डिलरमार्फत उपलब्ध आहे.

सदर बियाणे परमिटवर देण्यात येत असून ७/१२ व आधारकार्ड घेऊन शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयातून परवाना प्राप्त करून घ्यावा व संबंधित वितरकाकडून बियाणे प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात एक लाख ३६ हजार टन खताची आवश्यकता असून आज अखेर ९५ हजार २६२ टन खत उपलब्ध आहे.

शेतकऱ्यांना वेळेत खत उपलब्ध होण्यासाठी युरिया २८०० टन व डीएपी खताचा ५०० टन संरक्षित खत साठा विकेंद्रित पद्धतीने करण्यात आला आहे. शेतकऱ्यांची अडवणूक न होता, त्यांना खते आणि बियाणे योग्य किमतीत मिळावीत यासाठी कृषी विक्रेत्यांची तपासणी करण्यासाठी १२ भरारी पथके नियुक्त आहेत.

या पथकामध्ये कृषी विभाग व जिल्हा परिषद कृषी विभाग, वजन मापे निरीक्षक यांचे प्रतिनिधी आहेत. निविष्टाबाबत काही तक्रार असल्यास नोंदवण्यासाठी तक्रार नोंदवही ठेवण्यात आली आहे. तसेच कृषीमंत्री यांनी दिलेल्या सूचनेनुसार मोबाईल व्हॉटसॲप क्रं. ९८२२६६४४५५ वर तक्रार नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी बियाणे, खते व औषधे खरेदी करताना नांमाकीत कंपनीचा आग्रह धरावा तसेच पक्के बिल घ्यावे जेणेकरून शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही. कृषी निविष्ठाबाबत कोणतीही तक्रार असल्यास जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयात स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाची सकाळी आठ ते संध्याकाळी सातपर्यंत ७४९८९२१२८४ क्रमांक संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra River Rejuvenation: अखेर नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन

POCRA Research Agreement: ‘पोकरा’अंतर्गत संवर्धित शेतीसाठी संशोधन करार

Supe Water Supply Scheme: डोक्यावरील हंडा उतरणार !

Revenue Officer Corruption: उपळाईचा मंडल अधिकारी लाच घेताना अटकेत

Rural Development: लोकाभिमुख होऊन गावांची विकासकामे करा: ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे

SCROLL FOR NEXT